महाआवास अभियान हे देशातील गतीमान पध्दतीने राबविलेले एकमेव अभियान

महाआवास अभियांना अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम
महाआवास गोरगरिब भूमीहीन यांच्या साठी हक्काचा निवारा देणारे अभियान
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते 5 लार्भाथ्यांना प्रतिकात्मक घराच्या किल्लीचे वाटप

औरंगाबाद,१५ जून /प्रतिनिधी:- औरंगाबाद महाआवास अभियानाअंतर्गत राज्यातील बेघर नागरिकांना ग्रामविकास, सामाजिक न्याय तसेच महसुल या तिनही विभागाच्या समन्वयातून हक्काचा निवारा देणारे व जवळपास 15 लाख लोकांना घर उपलब्ध करून दिल्याबद्दल लार्भाथ्यांना हक्काचा निवारा मिळाल्याबद्दल मी लार्भाथ्याचा अभिनंदन करतो अशा शब्दात  आज महाआवास अभियानाच्या ई-गृहप्रवेश कार्यक्रमाच्या प्रसंगी मा.मुख्यमंत्री यांनी मुंबईतील सहयाद्री अतिथी गृह येथील मुख्य कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले.

Displaying 4.JPG

          औरंगाबाद जिल्ह्यातील प्रातिनिधीक स्वरुपामधील 5 लार्भाथ्यांना प्रतिकात्मक किल्लीचे वाटप विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते  करण्यात आले.

          यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, उपआयुक्त अविनाश गोटे, सहायक उपायुक्त वीणा सुपेकर, प्रकल्प संचालक संगिता पाटील, यांच्यासह महाआवास योजनेतील लाभार्थी लहु देविदास चव्हाण दौलताबाद, सुभाष रायजी कुबेर, गेवराई कुबेर, कविता सरोदे डायगव्हाण, वर्षा रवी चांदणे डायगव्हाण, पद्दमाबाई माळी, डोणवाडा यांची उपस्थिती होती.

Displaying 5.JPG

          विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी लार्भाथ्यांना महाआवास अभियानाच्या माध्यमातून  हक्काचे घर मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन हे घर अजून सुशोभित करुन आनंदाने राहा अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.

          जिल्हधिकारी सुनील चव्हाण व डॉ.मंगेश गोंदावले यांनी लार्भाथ्यासोबत विविध सोयीसुविधा विषयी संवाद साधला. व त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

          प्रतिनिधीक स्वरुपात उपस्थित असलेल्या महाआवास योजनेच्या लाभार्थ्याचे  स्वागत  विभागीय आयुक्त कार्यालयात केले. यावेळी पद्दमाबाई माळी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, मी आधी कुडाच्या  घरात राहत होते. पण महाआवासच्या शबरी  योजनेच्या लाभ मिळाल्याने मी पक्क्‍ आणि स्वत: हक्काचे घर मिळाल्योन आनंद होत असून मी या शासनाचे आभार मानते अशा भावणा व्यक्त केल्या. यानंतर औरंगाबाद तालुक्यातील डायगव्हाण गावातील वर्षा रवी चांदणे यांनी देखील स्वत:चे घर उपलब्ध झाल्याबद्दल आनंद होत असल्या बाबतची प्रतिक्रिया व्यक्त केली.

          कविता किशोर सरवदे यांना आत्ता राहयला पक्क्‍ घर मिळाल्याबद्दल धन्यवाद व्यकत्‍ केले. तसेच सुभाष रयाजी ठूबे तालुका औरंगाबाद यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की आम्हाला आधी मातीचे घर होते. पण शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेतून पक्के घर मिळाले यामूळे आम्ही शासनाचे आभारी आहोत.

          या लोकार्पण सोहळ्याच्या प्रास्ताविकात महाआवास आभियानाचे संचालक राजाराम दिघे यांनी 100 दिवसांत या अभियान यशस्वी  करण्यासाठी केलेले प्रयत्न उपक्रम, प्रशिक्षण आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला.

          यानंतर महाआवास योजनेवर आधारित ‘यशोगाथा’ या पुस्तीकीचे प्रकाशन तसेच दिनदर्शिकाचे प्रकाशन आणि महाआवास या संकेतस्थळाचे बटन दाबून अनवारण केले.