लॉकडाऊनच्या काळात ४७७ सायबर गुन्हे दाखल; २५८ जणांना अटक

लॉकडाऊनच्या काळात ४७७ सायबर गुन्हे दाखल; २५८ जणांना अटक

मुंबई दि.१४-  लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ४७७ विविध गुन्हे महाराष्ट्र  सायबरने दाखल केले असून २५८ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ४७७ गुन्ह्यांची नोंद कालपर्यंत झाली आहे. जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे-

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल

■ व्हॉट्सॲप-  195गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स –  195 गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ-  24 गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – 9 गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट-  4 गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर –  ५० गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २५८ आरोपींना अटक.

■  १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

■ पुणे शहरांतर्गत सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये एका नवीन गुन्ह्याची नोंद

पुणे शहरात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ५ वर

■ सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या ट्विटर हँडलवर कोरोना महामारीबाबत सरकार ज्या उपाययोजना करत आहेत त्यावर टिपणी करताना त्यास राजकीय रंग देणाऱ्या आशयाचा मजकूर ट्विट केला होता. त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

ऑनलाईन खरेदी करताना सावधनता बाळगा

सध्या बरेच नागरिक अनेक व्यवहार व अगदी किराणा सामानसुद्धा ऑनलाईन खरेदी करत आहेत व त्यांचे बिल पण आपल्या क्रेडिट /डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे  देत आहेत .सायबर भामटेसुद्धा सर्वसामान्य नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवीन युक्त्या शोधत असतात. त्यासाठी त्यांनी एक नवीन प्रोग्रॅम कोड बनविला आहे . हा प्रोग्रॅम कोड या सर्व अशा वेबसाईटमध्ये  लपून बसतो व सर्व सामान्य नागरिक जेव्हा ऑनलाईन पैसे भरण्यासाठी आपले डिटेल्स जसे की इंटरनेट बँक अकॉउंटचा id व पासवर्ड , डेबिट /क्रेडिट कार्ड्स चे पिन क्रमांक ,CVV क्रमांक ,मोबाईल नंबर इत्यादी भरतात तेव्हा हा प्रोग्रॅम कोड हे सर्व copy करतो व सायबर भामटे त्याची नोंद करतात .तुमची ही सर्व माहिती जमा करून सायबर भामटे एकतर डार्कनेटवर किंवा इंटरनेटवरील अन्य काळ्या बाजारात विकतात किंवा एखादा मोठा आर्थिक गुन्हा करून तुम्हाला लुबाडायचा त्यांचा डाव असतो.

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना सावध राहा . शक्यतो ऑनलाईन पेमेंट करणे टाळा व  कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडा .तुम्ही एखादा ऑनलाईन व्यवहार केल्यावर लगेच आपल्या बँकेच्या खात्यातील रक्कम तपासून बघा ज्यामध्ये फक्त खर्च झालेली  रक्कम वजा झाली असली पाहिजे . तुम्ही ऑनलाईन आर्थिक व्यवहार ज्या वेबसाईटवर करत असाल तर सदर वेबसाईट सुरक्षित आहे याची खात्री करून घ्या . तुम्ही जर एखाद्या ऑनलाईन आर्थिक गुन्ह्यात फसविले गेले असाल तर कृपया न घाबरता त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करा व www.cybercrime.gov.in  या संकेतस्थळांवर देखील नोंद करा असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’ने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *