नांदेडकरांना दिलासा,नऊ व्यक्ती कोरोनातून बरे झाल्याने सुट्टी

कोरोनाचा एकही अहवाल पॉझिटिव्ह नाही

नांदेड दि. 14 :- नांदेड जिल्ह्यात रविवार 14 जून रोजी सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात एकही स्वॅब पॉझिटिव्ह न आल्याने नांदेड जिल्हावासीयांनी मोठा दिलासा मिळाला आहे. पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील 6 बाधित व्यक्ती व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील 2 बाधित तसेच कोविड केअर सेंटर माहूर येथील 1 असे 9 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत एकुण 177 व्यक्ती कोरोना आजारातून बरे झाले आहेत.

रविवारी प्राप्त झालेल्या 98 अहवालापैकी 94 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. चार अहवालांचा निष्कर्ष अनिर्णीत आहे. सद्यस्थितीत 66 बाधित व्यक्तींवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 बाधितांमध्ये 52 वर्षाची एक महिला आणि 52 व 54 वर्षाचे दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या एकुण 13 आहे.

नांदेड जिल्ह्यात 66 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 17, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 42, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 2 बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून 5 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. रविवार 14 जून रोजी 135 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.

सर्वेक्षण- 1 लाख 48 हजार 51,

घेतलेले स्वॅब 5 हजार 19,

निगेटिव्ह स्वॅब 4 हजार 347,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- निरंक,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती 256,

स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 191,

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 83,

मृत्यू संख्या 13,

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 177,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती 66,

स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 135 एवढी संख्या आहे.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *