राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोह्यात मनसेच्या वतीने पाल वस्तीवर जेवणाचे डब्बे वाटप

लोहा,१४ जून /प्रतिनिधी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांचा वाढदिवस लोह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या काळात उपेक्षित भटक्या जमाती च्या पाल वस्तीवर जिल्हाध्यक्ष गजानन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष रोहित कटकमोड यांनी जेवणाचे डब्बे तसेच ग्रामिण रुग्णालयातही डब्बे वाटप केले व राज ठाकरे यांचे अभिष्टचिंतन केले.   

महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका लोहा च्या वतीने संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोह्यात विविध उपक्रम राबविण्यात आले.जिल्हाध्यक्ष गजानन पाटील चव्हाण यांच्या उपस्थिती भटक्यांच्या पाल वस्तीवर जेवण डब्बे देण्यात आले तालुकाध्यक्ष रोहित कटकमोड यांच्यासह व्यंकट पवार, विक्रांत नळगे, चंदू धोंगडे , नारायण हिलाल, शिवराज कदम, श्रीधर दाढेल, गणेश दाढेल, सुनील सूर्यवंशी, तुषार बॊढारे, शशिकांत मोरलवार, सोमनाथ शिराळे, गणेश दाढेल यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष गजानन पाटील यांनी राजठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकाध्यक्ष रोहित कटकमोड व कार्यकर्त्यांनी जो पाल वस्तीवरील भटक्या जमातीच्या लोकांसाठी जेवण डब्बे उपक्रम राबविला तो स्तुत्य आहे .येत्या काळात राज्याच्या राजकारणात राज यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार असून कार्यकर्त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष गजानन पाटील यांनी केले व  प्रेरणास्थान संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले