आंध्रप्रदेशातून गांजाची तस्‍करी,चौ‍थ्‍या आरोपीला बेड्या ठोकल्या

औरंगाबाद ,१२ जून /प्रतिनिधी:-   

आंध्रप्रदेशातून गांजाची तस्‍करी केल्या प्रकरणात पोलिसांनी  चौ‍थ्‍या आरोपीला बेड्या ठोकल्या. अरुण अंबादास माळवे (३८, रा. दुर्गा कॉलनी, चिकलठाणा) असे आरोपीचे नाव आहे. त्‍याला १३ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी शनिवारी दि.१२ दिले.

याशिवाय गुन्‍ह्यात यापूर्वी अटक करण्‍यात आलेल्या तिघा आरोपींना देखील न्‍यायालयाने १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  आरोपी श्रीकांत बनसोडे, जगन्‍नाथ लाठे आणि कारभारी ऊर्फ भिकन रिठे अशी आरोपींची नावे आहेत.

कारमधून (क्रं. एमएच-२०-एए-४४१३) कारमधून गांजाची तस्‍करी करत असल्याची माहिती गुन्‍हे शाखेला मिळाली होती.  पथकाने सापळारचून कारमधून गांजाची तस्‍करी करणाऱ्या  दोघांना अटक केली, तर दोन जण पसार झाले. आरोपींकडून मोबाइल, गांजा आणि कार असा सुमारे १२ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्‍त करण्‍यात आला.या  प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

अटक करण्‍यात आलेल्या आरोपीने अटक केल्यास स्‍वत:च्‍या जीवाचे बरे वाईट करुन तुमचे नाव घेईन अशी पोलिसांना धमकी दिली. दरम्यान आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील आमेर काजी यांनी गुन्‍ह्यातील पसार आरोपी सनी याला अटक करणे आहे. आरोपींनी गांजा कोठून, कोणाकडून आणला आणि कोणाला विक्री करणार होते याचा तपास करणे आहे. आरोपींनी आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.