औरंगाबाद शहरात केवळ १९ रुग्ण कोरोनाबाधित 

जिल्ह्यात 139216 कोरोनामुक्त, 1948 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,११ जून /प्रतिनिधी:- औरंगाबाद जिल्ह्यात आज 175 जणांना (मनपा 67, ग्रामीण 108) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 139216 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 113 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 144486 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3322 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1948 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (19)

घाटी 5, नवजीवन कॉलनी 1, हर्सूल 1, उस्मानपूरा 1, स्वराज नगर 1, ज्योती नगर 1,  अन्य 8

ग्रामीण (94)

गदाना ता.खुल्ताबाद 1,सांजोळ ता.फुलंब्री 1, भांडगाव ता.खुल्ताबाद 1, कसाबखेडा, ता.खुल्ताबाद 1, शिरसमाळ ता.औरंगाबाद 1, दौलताबाद ता.औरंगाबाद 1, अन्य 88

मृत्यू (09)

घाटी (06)

1.       स्त्री/60/वडनेर, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

2.      पुरूष/64/पिशोर, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

3.      स्त्री/65/चिकलठाणा, औरंगाबाद.

4.      स्त्री/76/शांतीपूरा, नंदनवन कॉलनी, औरंगाबाद.

5.      पुरूष/65/सितानाईक तांडा, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

6.      पुरूष/65/सटाणा, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.

जिल्हा सामान्य रुग्णालय (1)

1.   पुरूष/70/ दोनवाडा, ता. औरंगाबाद

खासगी रुग्णालय (2)

1.                 पुरूष/58/भावसिंगपूरा, औरंगाबाद.

2.                पुरूष/ 39/ गोळेगाव, ता. सिल्लोड