श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघांची घोषणा,शिखर धवन हा भारतीय संघाचा कर्णधार

मुंबई ,१० जून /प्रतिनिधी:- श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी -२० मालिकेसाठी भारतीय संघांची घोषणा झाली आहे.  शिखर धवन हा भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. तर भुवनेश्वर कुमार उपकर्णधार असणार आहे. टीम इंडियाची मुख्य टीम सध्या इंग्लंडमध्ये आहे. त्याचवेळी जुलै महिन्यात भारतीय क्रिकेट टीमची दुसरी फळी श्रीलंकेविरुद्ध वन-डे आणि टी20 मालिका खेळणार आहे. त्यामुळे या टीम B मध्ये कुणाला स्थान मिळतं याची उत्सुकता होती.

श्रीलंकेमध्ये होणाऱ्या 3 ODI आणि T20 च्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी हा संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळेल. सर्व सामने कोलंबोत होतील.

या शिवाय संघात पृथ्वी शॉ, पडिक्कल, आर गायकवाड, एस यादव, एम पांडे, हार्दिक ​​पंड्या, नितीन राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, चहर, के गौथम, कृणाल पंड्या, के यादव, व्ही चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (व्हीसी), डी चहर, एन सैनी, सी सकरिया यांचा सहभाग आहे.

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (विकेट कीपर), संजू सॅमनस (विकेट कीपर), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार)दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया.