नांदेड जिल्ह्यात 22 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

बाधितांमध्ये 13 पुरुष तर 9 महिलांचा समावेश आठ बाधितांना बरे झाल्याने सुट्टी

नांदेड दि. 13 :- नांदेड जिल्ह्यात आज सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात 22 व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील ही संख्या 256 वर पोहचली आहे. एकाबाजुला बाधितांची संख्या वाढली असली तरी दुसऱ्या बाजूला पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील 5 व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील 3 बाधित असे 8 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आल्याने मोठा दिलासाही मिळाला.

बावीस बाधितांपैकी 13 पुरुष तर 9 महिलांचा समावेश आहे. यामध्ये अनुक्रमे 25,28, 29, 30 (2), 31, 34, 35 (2), 49, 51, 55 व 67 वर्षाचे 13 पुरुष तर महिलांमध्ये अनुक्रमे 31, 36, 43, 45, 47, 48 (2), 49 व 55 अशी आहेत. या सर्व बाधितांची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे. आतापर्यंत एकुण 168 व्यक्ती कोरोना आजारातून बरे झाले आहेत. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या एकुण 13 आहे.

शनिवार 13 जून रोजी 22 कोरोना बाधितांमध्ये चिखलवाडी परिसरातील 1 पुरुष वय वर्षे 55 व 1 महिला वय वर्षे 48, विजय कॉलनी 1 महिला वय वर्षे 55, दीपनगर 1 पुरुष वय 49 वर्षे, एचआयजी कॉलनी 1 महिला वय वर्षे 48, झेंडा चौक 1 महिला वय वर्षे 45, स्वामी विवेकानंदनगर 1 पुरुष वय वर्षे 34, सोमेश कॉलनी 1 पुरुष वय वर्षे 51 व 1 महिला वय वर्षे 49, पद्माजा सिटी 1 महिला वय वर्षे 43, सिडको 1 महिला वय वर्षे 47, यशवंतनगर 1 पुरुष वय वर्षे 35, विणकर कॉलनी 1 पुरुष वय वर्षे 30, भाग्यनगर रोड 1 महिला वय वर्षे 31, संत ज्ञानेश्वरनगर 1 पुरुष वय वर्षे 35, न्यायनगर 1 पुरुष वय वर्षे 28, श्रीकृष्णनगर तरोडा (बु) 1 पुरुष वय वर्षे 31, विश्वदीपनगर 1 पुरुष 25, महावीर चौक 1 पुरुष वय वर्षे 67, इतवारा 1 पुरुष वय वर्षे 30, चैतन्यनगर 1 महिला वय वर्षे 36 व अर्धापूर तालुक्याती कामठा बु. येथील 1 पुरुष वय वर्षे 29 एवढे आहे.

शनिवारी प्राप्त झालेल्या 97 अहवालापैकी 62 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. सद्यस्थितीत 75 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 बाधितांमध्ये 52 वर्षाची एक महिला आणि 52 व 54 वर्षाचे दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. नांदेड जिल्ह्यात 75 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 15, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 52, माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर 1, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 2 बाधित असून 5 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. शनिवार 13 जून रोजी 163 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.

सर्वेक्षण- 1 लाख 44 हजार 880,

घेतलेले स्वॅब 4 हजार 949,

निगेटिव्ह स्वॅब 4 हजार 253,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 22,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती 256,

स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 187,

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-83,

मृत्यू संख्या- 13,

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 168,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती 75,

स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 163 एवढी संख्या आहे.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *