शिर्डीच्या  श्री साईबाबा संस्थान ट्रस्टची नवीन समिती नेमण्यासाठी राज्य सरकारला शेवटची संधी  

औरंगाबाद ,९ जून /प्रतिनिधी :-शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचा कारभार करण्यासाठी पूर्णवेळ समिती नेमण्यासाठी मुंबई उच्चन्यायालयाने  राज्य सरकारला अखेरची संधी दिली. दोन आठवड्यांत जर नवीन समिती नेमण्यात राज्य सरकार अपयशी ठरले तर ते सरकारविरूद्ध अवमान याचिकेला तोंड द्यावे लागेल असे  औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व  न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.


खंडपीठाने विद्यमान समितीला  ट्रस्टने संचालित केलेल्या दोन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या देखभालीशी संबंधित विविध विषयांवर बसून चर्चा करण्यास सांगितले आहे.
ट्रस्टने व विरोधात दाखल केलेल्या याचिका आणि दिवाणी  अर्जांचे अवलोकन केले तर,संस्थानच्या प्रशासकीय समितीचा मुद्दा २००४ पासून चर्चेत आला आहे,त्यानंतर भक्त मंडळाची समितीची जागा  ट्रस्टची  योग्य समितीने  घेतली. समितीची स्थापना तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली.सध्या समितीचे अध्यक्ष कन्हुराज बागाते हे आहेत आणि इतर सदस्य अहमदनगरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत अणेकर तसेच शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी  आणि जिल्हा धर्मादाय आयुक्त यांचे प्रतिनिधी आहेत.
तथापि, बागटे आणि अणेकर यांच्यात वाद झाला आहे, असे याचिकाकर्त्यांचे अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांनी सांगितले. राज्य सरकारने यावर्षी मार्च महिन्यात ट्रस्टला दोन महिन्यांत योग्य समिती नेमली जाईल  असे विधान केले होते. “तथापि, बराच वेळ गेला आहे. आता त्यांनी लवकरात लवकर समिती नेमली पाहिजे,” असे तळेकर यांनी खंडपीठाला सांगितले.

खंडपीठातील  सरकारी वकील डी. आर. काळे यांनी न्यायाधीशांना सांगितले की,कोरोना  साथीच्या रोगामुळे समितीची नियुक्ती होऊ शकली नाही.त्यामुळे न्यायालयाने यासाठी वेळ द्यावा अशी विनंती त्यांनी केली. 

हा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती गंगापुरवाला म्हणाले, “सध्या कोरोना साथीचा रोग नियंत्रित  आहे. राज्य नेमणुका करू शकता. नवीन समिती नेमण्यासाठी दोन आठवड्यांसाठी शेवटची संधी देतो असे न्यायालयाने राज्य सरकारला बजावले. 
“एकतर लवकरात लवकर समिती नियुक्त करा किंवा आम्ही अवमान कार्यवाही करू.”असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने  तातडीने समितीला या सर्व प्रश्नांवर बसून चर्चा करण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी दिला.