साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते -बियाणे – कृषिमंत्री

मुंबई, दि. १३: कोरोनाच्या काळात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावरच खते, बियाणे पुरविण्याच्या कृषि विभागाने केलेल्या प्रयत्नामुळे आतापर्यंत १ लाख ९७ हजार मेट्रिक टन खते तर १ लाख १८ हजार क्विंटल बियाणे आणि ३ लाख ५३ हजार कापूस बियाण्यांच्या पाकिटांचा पुरवठा करण्यात आला आहे.६ लाख ६३ 

हजार शेतकऱ्यांपर्यंत कृषि निविष्ठांचा पुरवठा झाला असून त्यासाठी राज्यभरात ५६ हजार २१६ शेतकरी गट कार्यरत असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे 

यांनी सांगितले.

कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन असल्याच्या काळात राज्यात खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले.कृषिमंत्री,सचिव,आयुक्त यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सातत्याने बैठका घेऊन खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. खरीपाकरिता कृषि निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शेतकरी गटांमार्फत बांधावरच खते, बियाणे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे  दादाजी भुसे यांनी सांगितले.

कालपर्यंतराज्यभरातपुरविण्यातआलेल्याकृषिनिविष्ठांचीमाहितीअशी:

·       ठाणे विभागात ६६६२ गटांच्या माध्यमातून ८६ हजार ७४८ शेतकऱ्यांना ४९९६ मेट्रीक टन खते आणि १० हजार २३० क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे.

·       कोल्हापूर विभागात २७६६ गटांनी ४५ हजार १११ शेतकऱ्यांना १४ हजार ७४० मेट्रीक टन खत आणि ४९५७ क्विंटल बियाणे पुरविलं आहे.

·       नाशिक विभागात ८०३५ गटांच्या माध्यमातून १ लाख ४६ हजार २५२ शेतकऱ्यांना ३६ हजार ५७५ मेट्रीक टन खत व १४ हजार ५११ क्विंटल बियाणे पुरविलं आहे.

·       पुणे विभागात १८ हजार १८१ गटांनी १ लाख १७ हजार ६३५ शेतकऱ्यांना १९ हजार १८१ मेट्रीक टन खत तर ६९१४ क्विंटल बियाणे पुरविले आहे.

·       औरंगाबाद विभागात ३७१६ गटांनी ६३ हजार ९६३ शेतकऱ्यांना ४२ हजार ५५९ मेट्रीक टन खत आणि ७४१९ क्विंटल बियाणे पुरविले आहे.

·       लातूर विभागात ७९४९ गटांनी ८४ हजार ७७६ शेतकऱ्यांना ३८ हजार ५०१ मेट्रीक टन खते, १५ हजार २२८ क्विंटल बियाणे पुरविले आहे.

·       अमरावती  विभागात ६२२१ गटांनी ८९ हजार शेतकऱ्यांना ३१ हजार ४७४ मेट्रीक टन खत तर ४५ हजार ५८५ क्विंटल बियाणे पुरविले आहे.

·       नागपूर विभागात २६८६ गटांनी ३० हजार ६६९ शेतकऱ्यांना ८४३१ मेट्रीक टन खते आणि १२ हजार ५९२ क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे.

राज्यात अमरावती विभागात सर्वाधिक ४३ हजार ६५५ कापूस बियाणे पाकीटांचा पुरवठा झाला आहे. विभागामार्फत बांधावर खते, बियाणे पुरवठा करण्याची 

मोहिम सुरू असून जास्तीत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *