अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायदा गिऱ्हाईकास गैर लागू

प्रोझोन मॉलच्‍या व्‍यवस्‍थापकासह इतरांना दोषमुक्त करण्‍याचे आदेश

औरंगाबाद,९ जून /प्रतिनिधी:- 

अनैतिक देह व्‍यापार प्रकरणात प्रोझोन मॉलच्‍या व्‍यवस्‍थापकासह इतरांना दोषमुक्त करण्‍याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाच्‍या न्‍या. विभा वी. कंकणवाडी यांनी दिला.

८ डिसेंबर २०१९ रोजी गुन्हे शाखेने सातारा परिसरत दोन ठिकाणी छापा टाकून अनैतिक देह व्यापार करणाऱ्या दोन दलाल व इतरांविरोधात कलम ३७० (अ)२, भादवी कलम ३,४,५,६, अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायदा व कलम ६७, ६७ (अ) आयटी कायदा व ६५ मुंबई प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मध्ये घटनास्थळी अर्शद सज्जाद अली, अमोल शेजूळ आणि ज्ञानेश्वर जराड यांना गिर्हाईक म्हणून पकडण्‍यात आले होते. गुन्‍ह्यात वरील तिघांना जामीन मिळाल्यानंतर पोलिसांनी त्‍यांच्‍या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरण न्‍यायालयात प्रलंबित असतांना वरील तिघांमार्फत दोषमुक्त करण्यासाठी सत्र न्यायाधीश यांच्यासमोर अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र न्यायालय अर्ज नामंजूर करून आरोपींविरोधात कलम ५१ (अ) आणि अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायदा व कलम ३७०(२) नुसार दोषारोप ठेवण्याचे आदेशित केले होते.

या आदेशाविरोधात अर्शद अली, अमोल शेजूळ आणि ज्ञानेश्‍वर जराड यांनी अभयसिंह भोसले यांच्‍या मार्फत औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. श्रीमती विभा वी. कंकणवाडी यांनी पूर्वीच्या निवाडयाचा दाखला देत असे नमूद केले की अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायदा मध्ये नमूद केल्या प्रमाणे कलम ५ (१) अ च्या व्याख्या मध्ये मूद केल्याप्रमाणे मिळवणे ही संकल्पना गिर्‍हाईकाच्या संदर्भात लागू होत नाही दलाल व गिराईक काम मधील संभाषण हा सबळ पुरावा असू शकत नाही आणि त्यामुळे आरोपी विरोधात खटला चालवण्यास अनुमती देता येणार नाही.याचिकेच्‍या सुनावणी अंती न्‍यायालयाने तिघांना खटल्यातून दोषमुक्त करण्याचे आदेश दिले. तिन्ही आरोपीतर्फे अभयसिंह भोसले यांनी काम पाहिले.