युवासेनेच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य वृक्षारोपण सोहळयास सुरुवात

Displaying WhatsApp Image 2021-06-09 at 3.33.43 PM.jpeg

औरंगाबाद,९ जून /प्रतिनिधी:- पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन करणे काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  यांच्या वाढदिवसानिमित्त ‘ माझी वसुंधरा अभियाना’निमित्त ‘आदित्य वृक्षारोपण सोहळयास’ सुरुवात आज ‘महाराणा प्रताप उद्यान’ (कॅनॉट प्लेस) येथून करण्यात आली.या कार्यक्रमाचे संयोजन धर्मराज अंबादास दानवे यांनी केले.
वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण, कार्बन डायॉक्साईडचे, उत्सर्जन, जंगलाचा ह्रास, जंगलातील वणवे, वाढते तापमान यामुळे निसर्गाचा समतोल ढासळला. त्यामुळे अनेक पाऊस, भूकंप, त्सुनामी विविध प्रकारची वादळे अशी अनेक संकटे येत आहेत. या संकटांना राखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे ही सध्या काळाची गरज आहे. वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली आहे. स्वच्छ, शुद्ध व ताजी हवा राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाचे आहेत. ऑक्सिजन देणार्‍या झाडांची देखील युवासेनेच्या माध्यमातून संपूर्ण शहरामध्ये लागवड करण्यात येणार आहे तसेच लागवड झाल्यानंतर ही झाडे जगविण्यासाठी सुद्धा युवासेना काम करणार असे प्रतिपादन  युवासेना चिटणीस धर्मराज अंबादास दानवे यांनी केले.

May be an image of 3 people, people standing, tree and outdoors


या वृक्षारोपण प्रसंगी मनोज गांगवे,शिवराज शिंदे,संकेत डोईफोडे, शिवा कावळे,राजेश बनकर,आकाश दानवे,देविदास खरात,गोविंद ईघारे , विजय भांडारकर,शिवा आहेर, हरिष पाटील,विशाल गायकवाड,प्रभात पूर्वार तुषार जाधव,कल्पेश आहेर,साई तुपे,आदित्य पळसकर, अभिशेक जाधव,यश चौधरी,संकेत मोरे,उमेश जाधव,,संकेत कसबेकर,प्रसाद पुरी,सुदर्शन खरे,सर्वेश ,मनोज मेहरे,सुनील घोरपडे,अक्षय घोरपडे,विशाल आहेर,सुहास लोखंडे,शंतनु शिडलंबे,  किशू  महाजन,विशाल आहेर,जयदीप वाघमारे,अंकुश वाघ,संघपाल हिवाळे,सार्थक गानोरे,ऋषिकेश पोद्दार,ओंकार देशपांडे आदी उपस्थित होते.