काँग्रेसचे भाजप विरोधात आंदोलन, पण राष्ट्रवादीच्या “पंपा” वर

लोहा,९ जून /प्रतिनिधी :-लोहा कंधार तालुक्यात काँग्रेस पक्ष ” आता ‘ सहयोगी ” भूमिकेत आला आहे.आणखी पुढची पंधरा वर्षे त्यांना आ शिंदे यांच्या मागे राहावे लागणार..अशी  राजकीय हेलकाव्याची स्थिती आहे . .त्याच पार्श्वभूमीवर कंधार मध्ये ‘भाजप प्रणित केंद्र सरकारच्या विरोधात कांग्रेसचे आंदोलन केले..पण ते आंदोलन होते  राज्यातील सत्ताधारी ‘ मित्र पक्ष ‘ राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या पेट्रोल पंपावर .   

राज्यात शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस -हे सत्ताधारी पक्ष . या महाविकास आघाडीला शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा आहे.केंद्रात भाजपाची सत्ता आहे.इंधन विरोधा राज्यात काँग्रेस पक्षाने सोमवारी आंदोलन केले . अनलॉक झाले आणि पहिल्याच दिवशी काँग्रेस नेते रस्त्यावर आले.लोह्यासह कंधार मध्येही इंधन दरवाढ  विरोधी आंदोलन झाले पण त्याची चर्चा झाली ती  महाविकास आघाडी सरकार मधील प्रमुख  सहयोगी पक्षाचे  जिल्हाध्यक्ष यांच्या पेट्रोल पंपावर झाल्यामुळे  कंधार तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी पाटील , जिल्हा सरचिटणीस व सक्रिय  नेते संजय भोसीकर, माजी उपनगराध्यक्ष मन्नानभाई चौधरी , सुलेमान शेख यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला .

भाजप विरुद्ध हे आंदोलन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या पेट्रोल पंपावर झाले.हेच आंदोलन दुसऱ्या पंपावर करता आले असते पण झाले नाही .काँग्रेस पक्षाने भाजप विरुद्ध आंदोलन केले पण ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भोसीकर यांच्या पंपावर . त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने केलेले आंदोलन चर्चेचा विषय ठरला.विधानसभा निवडणुकीत २००३ पासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे  उभा टाकणारा काँगेस पक्ष आता “कूस ” बदलणार आहे. 

आगामी  पंधरा वर्षे या दोन्ही तालुक्यातील  काँग्रेस पक्ष आ.श्यामसुंदर शिंदे यांच्या पाठीशी उभा राहणार  असे काँग्रेसचे नेते आ राजूरकर यांनी जाहीर केले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पेट्रोल पंपावर काँग्रेसचे आंदोलन झाले . हा योगायोग की..गेल्या ५० वर्षा पासून कंधार -लोहा मतदार संघात शे.का.प विरुद्ध काँग्रेस अशीच मुख्य  लढत  झाली .त्या पारंपरिक लढतीत  मैत्रीत बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पेट्रोल पंपावर  आंदोलन  झाले तर नाही ना..(? ) असा राजकीय तर्कवितर्क आता लावले जात आहेत.