शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत, पिरुपटेलवाडी येथून शेतकरी संवाद यात्रा – आ. अभिमन्यू पवार

निलंगा ,९ जून /प्रतिनिधी:-  शासन शेतकऱ्यांसाठी योजना तयार करते मात्र या योजनां शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत आपली शेतकरी संवाद यात्रा असून शेतरस्त्यांप्रमाणे केशर आंबा  लागवडीचा औसा मतदारसंघ पॅटर्न विकसित करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रस्ताव दाखल करावे असे आवाहन आ. अभिमन्यू पवार यांनी कासार बालकुंदा (ता. निलंगा) येथील मनरेगातून ग्रामसमुध्दी या अभियान दौऱ्यात शेतकऱ्यांशी बोलताना व्यक्त केले आहे. 

May be an image of 1 person, standing and indoor

       मंगळवार  दि.८ जुन रोजी पिरुपटेलवाडी,कासार बालकुंदा,ममदापूर,तांबाळा व तांबाळवाडी या गावांना भेटी देऊन आ. अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की  पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांनी आधुनिक शेतीची कास धरल्याने तेेेथील शेतकरी समृध्द झाला आहे.परंतु मराठवाड्यातील शेतकरी आजही पारंपारिक पद्धतीने शेती करत असुन त्यामुळे येथील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. मनरेगा अंतर्गत अनेक योजना असून शेतकरी संवादातून या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतक-यांनी रासायनिक खताऐवजी सेंद्रीय खताचा वापर करत पारंपारिक शेती सोडुन आधुनिक शेतीकडे भर दयावे व गांडूळ खत शेतीसाठी उत्तम असुन गांडुळ खत निर्मितीसाठी शासनाकडून अनुदानही दिले जाते त्यामुळे शेतक-यांनी गांडुळ खताची योजना राबवावी परभणी कृषी विद्यापीठाच्या सर्वेक्षणानुसार लातूर जिल्ह्यातील जमीन सात प्रकारचे फळबाग लागवडीसाठी योग्य असून शेतकऱ्यांनी फळलागवडी कडे वळावे.मनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे घेऊन आपली जमीन ओलिताखाली आणता येत असुन मत्स्य उद्योग करून त्यातुन लाखोचे उत्पन्न घेता येते. महाडीबीटी या पोर्टल वर शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत त्याही योजनांचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेवून शेती आधुनिक पद्धतीने करून शेतीचा विकास साधावा. फळबाग लागवड,आस्तारीकरणासह शेततळे, बांधावर वृक्षलागवड आदीसह जनावरांचा गोठा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन यावेळी बोलताना आ. अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांना केले.या चिलवंतवाडी, माळेगाव, कलमुंगळी व टाकळी येथेही आ. पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

May be an image of 3 people, people sitting, people standing and indoor

   यावेळी भाजपचे कासारसिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, नितिन पाटील, सुरेश बिराजदार, बळवंत पाटील, मनोहर मोरे, दतात्रय सारगे, श्रीमंत माने, ओम बिराजदार, लाला शेख , तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, सपोनी रेवनाथ डमाले, कृषी पर्यवेक्षक, कृषी मंडळधिकारी व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत आज चिलवंतवाडी, माळेगाव कल्याणी, कलमुगळी व टाकळी या गावांना भेटी देऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधला. शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यातून मतदारसंघात मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मनरेगातून शेततळे, सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प, जनावरांसाठी गोठा व बांधावर वृक्षलागवड आदी लाभ देऊन त्यांची आर्थिक उन्नती साधण्याचे नियोजन असून शेतकरी बांधवांनी त्यासाठी प्रस्ताव दाखल करावेत असे आवाहन केले.