उमरगा पोलिस वसाहतीत  वृक्षारोपण  

उमरगा,९जून /प्रतिनिधी :-
जागतिक पर्यावरण दिन निमित्त उमरगा  पोलिस वसाहतीत मान्यवरांच्या हस्ते  वृक्षारोपण करण्यात आले . 

शहरातील पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस वसाहतीमध्ये बुधवारी  राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, शांतिदूत परिवाराच्या राष्ट्रीय अध्यक्ष विद्याताई जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, शांतिदूत परिवारचे प्रदेश सरचिटणीस प्रा. युसूफ मुल्ला, मराठवाडा अध्यक्ष प्रा.जीवन जाधव उपस्थित होते.

Displaying IMG-20210609-WA0184.jpg


याप्रसंगी माजी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.जाधव यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ठिकठिकाणी वृक्षारोपण करणे गरजेचे असुन, त्याचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले. सध्या विविध आजाराच्या माध्यमातून सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. आपण पर्यावरणाची काळजी घेतल्यास पर्यावरण आपली काळजी घेणार असल्याचेही यावेळी सांगितले. 

Displaying IMG-20210609-WA0183.jpg


पोलिस निरीक्षक श्री. अघाव यांनी सर्व पोलिस बांधवांच्या मदतीने यापुढेही वृक्षारोपण करू असे यावेळी सांगितले.