औरंगाबादमध्ये सात करोनाबाधितांचा मृत्यू

Image

औरंगाबाद:गेल्या १६ तासांमध्ये ३६ ते ६५ वयोगटातील सात करोनाबाधितांचा उपचारादरम्यान (घाटी) मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्युची संख्या १३५ झाली आहे. आज 105 रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्ण संख्या 2535 झाली असून आजपर्यंत 1400 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर 135 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1000 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मदनी कॉलनी येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाला ९ जून रोजी घाटीमध्ये दाखल करण्यात आले होते व दुसऱया दिवशी रुग्ण हा करोनाबाधित असल्याचे स्वॅब चाचणीवरुन स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान श्वसनविकार, न्युमोनिया, मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोगामुळे रुग्णाचा गुरुवारी (११ जून) सायंकाळी सहा वाजता मृत्यू झाला. फाजलपुरा येथील एसटी कॉलनीतील ५२ वर्षीय पुरुष रुग्णाला गुरुवारी घाटीमध्ये दाखल केले होते व त्याचदिवशी प्राप्त झालेल्या स्वॅब रिपोर्टवरुन रुग्ण हा करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. श्वसनविकार, न्युमोनियामुळे रुग्णाचा गुरुवारी रात्री नऊ वाजता मृत्यू झाला. मिलकॉर्नर येथील ३६ वर्षीय पुरुष रुग्णाला ८ मे रोजी दाखल केले होते व १० जून रोजी प्राप्त झालेल्या स्वॅब रिपोर्टवरुन रुग्ण हा करोनाबाधित असल्याचे निदान झाले होते. मात्र उपचारादरम्यान श्वसनविकार, न्युमोनिया व इतर गुंतागुंत यामुळे रुग्णाचा शुक्रवारी (१२ जून) सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. कैलास नगर येथील ४० वर्षीय पुरुष रुग्णाला ७ जून रोजी दाखल केले होते व तो बाधित असल्याचे दुसऱया दिवशी निदान झाले असतानाच, न्युमोनिया, श्वसनविकार, मधुमेहाच्या गुंतागुंतीतून रुग्णाचा शुक्रवारी पहाटे साडेतीनला मृत्यू झाला. त्याचवेळी पद्मपुरा येथील ५० वर्षीय करोनाबाधित पुरूषाचा गुरुवारी (११ जून) रात्री नऊ वाजता, इंदिरा नगर, बायजीपुरा येथील ६१ वर्षीय करोनाबाधित पुरूषाचा शुक्रवारी पहाटे साडेचारला, तर आंबेडकर नगर, सिडको येथील ६२ वर्षीय करोनाबाधित पुरूष रुग्णाचा शुक्रवारी सकाळी आठला शहरातील एकाच खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत १०२, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण ३२ व जिल्हा सामान्य रुग्णालयात एक, अशा एकूण १३५ करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

जिल्ह्यातील नव्या १०५ बाधितांमध्ये कटकट गेट येथील १, समर्थ नगर २, रोशनगेट १, संजय नगर १, संभाजी कॉलनी १, सिल्कमिल कॉलनी १, सिडको १, राम नगर १, पीर बाजार २, उस्मानपुरा १, कबीर नगर, सातारा परिसर २, रोशनगेट ४, औरंगपुरा ५, सादात नगर २, बायजीपुरा ३, पुंडलिक नगर ६, सिटी चौक १, जुना बाजार, न्यू वस्ती २, चेतना नगर १, शिवाजी नगर ४, बौद्ध नगर, जवाहार कॉलनी २, सारंग सोसायटी २, उत्तम नगर १, महेश नगर २, गौतम नगर, जालना रोड १, न्यू हनुमान नगर १, जुना मोंढा, गवळीपुरा १, एन-आठ सिडको १, छावणी परिसर १, सुंदरवाडी १, गुलमंडी १, मुजीब कॉलनी, रोशनगेट १, ‍विशाल नगर ३, पटेल नगर २, रेणुका माता मंदिर, एन-नऊ १, यशोधरा कॉलनी, नेहरु नगर १, रहीम नगर १, भवानी नगर १, साई नगर, एन सहा, सिडको १, खोकडपुरा १, संजय नगर, आकाशवाणी परिसर १, एन-तीन, सिडको १, सिडको टॉउन सेंटर, एन-एक १, संत एकनाथ सोसायटी २, एन-चार, सिडको १, बारी कॉलनी १, रोझाबाग १, एमजीएम परिसर १, बजाज नगर २ आणि निल्लोड (ता. सिल्लोड) ३, वैजापूर १, मारीसुरी कॉलनी, गंगापूर १, गणेश नगर, पंढरपूर १, पडेगाव १, कन्नड २, मुकुंदवाडी १, खुलताबाद १, नारेगाव ३, कानडगाव १, शताबी नगर १, मल्हार चौक, विजय नगर, गारखेडा १, पटेल नगर, बीड बायपास रोड १, क्रांती चौक पोलिस स्टेशनजवळ १, सातारा गाव परिसर १, किराडपुरा १, एसआरपीएफ परिसर १ व इतर ठिकाणचे ४, या भागातील ४८ महिला व ५७ पुरुषांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.