आठ हजार रुपयांची लाच स्विकारताना दुय्यम निरीक्षकासह जवानाला अटक

उमरगा ,७ जून / नारायण गोस्वामी :-
बियर शॉपीच्या परवाना नूतनीकरणासाठी शासकीय चलन भरुन आठ हजार रूपयाची लाच स्विकारताना उमरगा येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे दुय्यम निरीक्षक व जवानाला उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. सात) रंगेहाथ पकडले.

51 per cent Indians paid bribe in the last 12 months: survey

तक्रारदाराची बियर शॉपी आहे. परवाना नुतनीकरणासाठी त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे कागदपत्र दाखल केली होती. त्यासाठीचे शासकिय चलन भरले होते, मात्र नुतनीकरणाचा परवना देण्यासाठी दुय्यम निरीक्षक सुमित सुधाकर  फावडे, जवान श्‍याम किशोर राऊत यांनी आठ हजाराची रुपये लाचेची मागणी केली. ती सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात पंचांसमक्ष स्वीकारली. याबाबत उमरगा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ही कार्यवाही पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे यांनी केली. या कामी त्यांना पोलीस अंमलदार शिवाजी सर्जे, मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके, चालक दत्तात्रय करडे यांनी मदत केली.
येथील दारूबंदी कार्यालयात गेल्या अनेक वर्शापासुन एक  झिरो पोलीस कार्यरत आहे . अनेक “व्यवहार” सांभाळून ,हा झिरो पोलीस ह्या कार्यवाहीतुन कसा काय सुटला अशी चर्चा शहरात दिसून येत होती .