भारतात दैनंदिन स्तरावर एक लाख व्यक्ती नव्याने कोविड बाधित, बाधितांच्या संख्येचा 61 दिवसांतील नीचांक

दैनंदिन पातळीवरील नव्या बाधितांची संख्या सलग 11व्या दिवशी 2 लाखांहून कमी

भारतातील सक्रीय कोविड बाधितांच्या संख्येत घट होऊन आज ती 14,01,609 वर पोहचली

दैनंदिन पातळीवर रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या सलग 25 व्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा अधिक

नवी दिल्ली,७ जून /प्रतिनिधी:- भारतात गेल्या 24 तासांच्या कालावधीत 1,00,636 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली. गेल्या दोन महिन्यांतील रुग्णसंख्येचा हा नीचांक आहे. गेले सलग 11 दिवस देशात दैनंदिन पातळीवर नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या  2 लाखांहून कमी आहे. “संपूर्णतः सरकार” दृष्टीकोनाअंतर्गत केंद्र सरकार आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश सरकारे यांनी केलेल्या एकत्रित आणि शाश्वत प्रयत्नांचा हा परिणाम आहे. 

भारतात सक्रीय कोविड बाधितांच्या संख्येत आता सतत घसरण दिसून येत आहे. देशातील सक्रीय कोविड बाधितांची संख्या आज सलग दुसऱ्या दिवशी 15 लाखांपेक्षा कमी म्हणजे 14,01,609  असल्याचे दिसून आले. ही रुग्णसंख्या सलग 7 व्या दिवशी 20 लाखांपेक्षा कमी आहे.

गेल्या 24 तासांच्या कालावधीत सक्रीय रुग्णसंख्येत एकूण 76,190 ने घट झाली आणि देशातील सध्याची सक्रीय रुग्णसंख्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या केवळ 4.85% इतकी आहे.

भारतात अधिकाधिक लोक कोविड-19 आजारातून बरे होत असल्यामुळे देशात दैनंदिन पातळीवर नव्याने रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या सलग 25 व्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. गेल्या 24 तासांत 1,74,399 रुग्ण कोविडमधून मुक्त झाले.

गेल्या 24 तासांत दैनंदिन पातळीवर नव्याने संसर्ग होणाऱ्या रुग्णांपेक्षा रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या 73,763 ने अधिक होती.

महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोना आजार झालेल्यांपैकी 2,71,59,180 व्यक्ती  कोविड -19 मधून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे एकूण रोगमुक्ती दर 93.94%  झाला असून या दराचा चढता कल आता दिसून येत आहे.

गेल्या 24 तासांत देशात एकूण 15,87,589 चाचण्या करण्यात आल्या आणि भारताने आतापर्यंत एकूण 36 कोटी 60 लाखांहून अधिक (36,63,34,111) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

एकीकडे देशात चाचण्यांचे प्रमाण वाढविले जात असतानाच दुसरीकडे पॉझिटीव्हिटी दरात सतत घसरण सुरु असल्याचे दिसते आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 6.34% इतका आहे. हा दर सलग 14 व्या दिवशी 10% हून कमी राहिला आहे.लसीकरणाच्या आघाडीवर बघितले तर, देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 23 कोटी 27 लाख मात्रा दिल्या गेल्या आहेत.
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, देशात 32,68,969 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 23,27,86,482 मात्रा देण्यात आल्या आहेत.

24.60 कोटी पेक्षा अधिक लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पुरवण्यात आल्या

कोविड लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून केंद्र सरकार, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य लसींच्या मात्रा उपलब्ध करून देत सहकार्य करीत आहे. या व्यतिरिक्त राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना लस उत्पादकांकडून थेट लसी खरेदी करता याव्यात यासाठी देखील केंद्र सरकार सुविधा पुरवित आहे. लसीकरण हा भारत सरकारच्या कोविड -19 च्या विरोधातील नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या रणनीतीचा चाचणी, रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, उपचार आणि कोविड योग्य वर्तन यांच्यासह लसीकरण एक महत्वाचा घटक आहे.

कोविड-19 लसीकरणाच्या  व्यापक आणि गतिशील तिसऱ्या टप्याची  1 मे 2021 पासून  अंमलबजावणी सुरु झाली आहे.

या धोरणानुसार, कोणत्याही उत्पादकाद्वारे तयार करण्यात आलेल्या केंद्रिय औषध प्रयोगशाळेने (सीडीएल) मंजूर केलेल्या 50  टक्के लसीच्या मात्रा भारत सरकारकडून घेतल्या जातील. पूर्वीप्रमाणेच राज्य सरकारांना लसींंच्या या मात्रा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातील.

आतापर्यंत केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 24 कोटी (26,60,80,900) पेक्षा जास्त लसीच्या मात्रा विनामूल्य आणि थेट खरेदी या दोन्ही स्वरुपात उपलब्ध करून दिल्या आहेत.

याव्यतिरिक्त, वाया गेलेल्या लसीच्या मात्रांसह एकूण 23,11,69,251इतक्या लसींच्या मात्रांचा वापर करण्यात आला आहे. (आज सकाळी 8 वाजता उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार).

एकूण 1.49 कोटी (1,49,11,649) कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा राज्य/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप उपलब्ध आहेत.