राज्यशास्त्र विषयात प्रा.किशोर नरहरी काळे यांना पीएच.डी

औरंगाबाद ,६ जून /प्रतिनिधी:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने प्रा.किशोर नरहरी काळे यांना राज्यशास्त्र विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे.

त्यांनी डॉ.डी.बी.आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भारतातील दहशतवाद आणि मानवी सुरक्षा एक चिकित्सक अभ्यास’ हा शोधप्रबंध सादर केला होता. प्रा.किशोर नरहरी काळे हे सध्या देवगिरी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागात कार्यरत आहेत. पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल म.शि.प्र.मंडळाचे सरचिटणीस आ.सतीश चव्हाण, अध्यक्ष आ.प्रकाश सोळंके, मा.पंडितराव हर्षे, प्राचार्य डॉ.शिवाजीराव थोरे, उपप्राचार्य डॉ.दिलीप खैरनार, डॉ.सी.एस.पाटील, डॉ.अनिल आर्दड, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.श्याम कदम, डॉ,वंदना सरनाईक, डॉ.राजेश लहाने आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.