औरंगाबाद जिल्ह्यात 211 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद जिल्ह्यात 137838 कोरोनामुक्त, 2567 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,५जून /प्रतिनिधी:- औरंगाबाद जिल्ह्यात आज 308 जणांना (मनपा 99, ग्रामीण 209) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 137838 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 211 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 143664 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3259 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2567 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (63) घाटी परिसर (4),अन्य (1), सातारा परिसर (2), एन-7 सिडको (2), खाराकुआ(4), वर्धमान रेसीडेन्सी(1), पडेगाव (1), रामजीनगर (1), मुकुंदवाडी (2), एन-9 सिडको (1), एन-8 (2), एन-5(2), एन-9 हडको (1), गारखेडा(3), साईनगर (2), हनुमान नगर (1), नाथप्रांगण(1), गणेश नगर (1), नारेगाव(1), एन-13 (1), कॅनॉट प्लेस (1), एन-1 सिडको (1), आयोध्या नगर (2),भावसिंगपूरा(1), मिटमिटा(1), पदमपुरा(1), विमानतळ परिसर (1), मेल्ट्रॉन हॉस्पीटल (1), नारळीबाग(1), अन्य 19

ग्रामीण (148) रांजणगाव(3), कन्नड(3), गंगापूर(2), झाल्टा (1), पिंपळखेडा (1), बजाजनगर (5),सिडको महानगर (1), वडगाव कोल्हाटी (1), सिल्लोड (2), पैठण (1), अन्य (128)

कोरोनाबाधितांचा मृत्यू (11)

घाटी (5) 1. 28, स्त्री, वीरगाव, वैजापूर2. 84, पुरूष, शहाबाजार3. 70, पुरूष, हिराडपुरी, पैठण4. 85, पुरूष, गेवराई, पैठण5. 70, पुरूष, देवगाव तांडा, पैठण

खासगी (4)1. 83, पुरूष, सुधाकर रोड, औरंगाबाद2. 55, पुरूष, नागेश्वरवाडी3. 39, पुरूष, विहामांडवा, ता. पैठण4. 38, पुरूष, शुलीभंजन, ता. खुलताबाद

जिल्हा सामान्य रूग्णालय (2) 1. 36 पुरूष, पोरगाव, ता. पैठण2. 62, स्त्री, फुलंब्री, ता. फुलंब्री