लातूर महानगरपालिके मार्फत 45 वर्ष पुढील वयोगटासाठीचे लसीकरण पाच केंद्रावर होणार

लातूर ,५ जून /प्रतिनिधी:- लातूर शहर महानगरपालिके मार्फत कोविड-19 लसीकरणाचे दिनांक 6 जून 2021 रोजीचे वेळापत्रक नागरिकांच्या माहितीसाठी पुढील प्रमाणे आहे. 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आलेले नाही. 45 वर्षे पुढील वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे, नागरीकांची गर्दी जास्त झाल्यास गरजेनुसार सत्र चालू होण्यापुर्वी टोकन क्रमांक देण्यात येतील अशी माहिती लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त यांनी दिली आहे.
विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था, लातूर, यशवंत शाळा प्रा.ना.केंद्र, साळे गल्ली, लातूर, दयांनद कॉलेज बार्शी रोड, लातूर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (I.T.I. कॉलेज, छत्रपती शिवाजी चौक लातूर) व शिवाजी शाळा, लेबर कॉलनी, लातूर येथे कोव्हीशिल्ड व कोव्हॅक्सीन लस दिली जाणार आहे.
45 वर्षावरील नागरीकांचा कोव्हिशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस (पहिला डोस घेऊन 84 दिवस पुर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील.) HCW व FLW याचा पहिला व दुसरा डोस. ऑनस्पॉट सकाळी 10 ते सायं.5 वाजपर्यंत राहील.
कोव्हॅक्सीन -45 वर्षावरील नागरीकांना फक्त दुसरा डोस (मार्च व एप्रिल महिन्यांमध्ये पहिला डोस घेतलेल्यांना प्राधान्य) HCW व FLW याचा दुसरा डोस.
शहरातील इतर लसीकरण केंद्र दि. 6 जून 2021 रोजी बंद राहतील याची नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन उपायुक्त लातूर शहर महानगरपालिका लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

जिल्ह्यात 45 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण सकाळी 10 ते सायं.5 वाजेपर्यंत सुरु राहणार

लातूर जिल्हयातील कोवीड-19 लसीकरणाचे दिनांक 6 जून 2021 रोजीचे वेळापत्रक पुढील पुढील प्रमाणे आहे.

45 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र- उपजिल्हा रुग्णालय उदगीर, पहिला व दुसरा कोविशिल्ड, व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पहिला व दुसरा डोस कोविशिल्ड,फक्त दुसरा कोव्हॅक्सीन लस ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय औसा,पहिला व दुसरा कोविशिल्ड, व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय चाकूर, पहिला व दुसरा कोविशिल्ड, ग्रामीण रुग्णालय देवणी पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय जळकोट येथे पहिला व दुसरा डोस कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय कासारशिरशी पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय रेणापूर येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट व जिल्हयातील सर्व प्रा. आ.केंद्र व कार्यक्षेत्र लसिच्या उपलब्धतेनुसार व सुक्ष्मकृती आराखडयानुसार पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट डोस सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत सुरु राहणार. 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सीनचा केवळ दुसरा डोस लसीच्या उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे.

45 वर्ष व त्यावरील वयोगटातील लाभार्थीसाठी लातूर जिल्हयात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांचे कार्यक्षेत्रात उपलब्ध्‍ साठयानुसार व प्रा.आ.केंद्राच्या सुक्ष्मकृती आराखडयानुसार दिनांक 6 जून 2021 रोजी कोवीशिल्ड/कोव्हॅक्सीन लसीचे लसीकरण करण्यात येत आहे.

लातूर जिल्हयातील नागरीकांनी कोवीड-19 लसीकरणाबाबत काही अडचण असल्यास 02382-223002 कोवीड हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.