औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे  रेल्वे स्टेशन व विमानतळ येथे 183 प्रवाशांची कोरोना चाचणी ,1 पॉझिटिव्ह

संचारबंदी काळात विना कारण फिरणाऱ्या 300 नागरिकांची तपासणी

औरंगाबाद ,४ जून /प्रतिनिधी :- औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने शासन निर्देशानुसार रेल्वे स्टेशन, विमानतळ येथे प्रवाश्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे .
१) रेल्वेस्टेशन येथे 4 जून  2021 रोजी 183 प्रवाश्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली.3 जून रोजी घेण्यात आलेल्या टेस्टचा रिपोर्ट 4 जून रोजी  प्राप्त झाला असुन यात कोणीही  प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले नाहीत.

२) विमानतळ येथे दि 4  जून रोजी  2021  विमान प्रवाश्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली नाही.काल केलेल्या टेस्ट चा रिपोर्ट आज दि 4 जून रोजी प्राप्त झाला असून यात 1 प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

एंट्री पॉईंट कोरोना चाचणी 3 पॉझिटिव्ह

औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने 20 मार्च 2021 पासून अन्य जिल्ह्यातून अथवा बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांची शहरातील एंट्री पॉईंटवर अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे .
आज दि 4 जून  2021 रोजी शहरातील 6 एंट्रीपॉईंट वर कोरोना अँटीजन चाचणी करण्यात आली.यात
1) चिकलठाणा येथे 221 पैकी 2   पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
2) हर्सूल टी पॉईंटवर 170 पैकी  1 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
3) कांचनवाडी येथे 213  पैकी   कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाहीत.
4) झाल्टा फाटा येथे 232 पैकी  कोणीही पॉझिटिव्ह आढळुन आले नाहीत.
5) नगर नाका येथे 468 पैकी  कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाहीत.
6) दौलताबाद टी पॉईंट येथे 199  जणांची टेस्ट करण्यात आली. यात कोणीही  पॉझिटिव्ह आढळून आले नाहीत.
संचारबंदी काळात विना कारण फिरणाऱ्या 300 नागरिकांची तपासणी

 शासन निर्देशानुसार कोविड 19 ब्रेक द चेन अंतर्गत महानगर पालिका हद्दीत मा प्रशासक तथा आयुक्त श्री आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार शहरात संचारबंदी काळात महानगर पालिका व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  विणाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे.
 शहरातील 15 पोलीस स्टेशन अंतर्गत 17 मोबाईल टीम द्वारे दुपारी 3 ते रात्री 11 या कालावधीत  अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे .
 आज  दि 4 जून  2021 रोजी 300 नागरिकांची अँटीजन टेस्ट करण्यात आली यात कोणीही नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले नाहीत.
प्रशासक तथा आयुक्त श्री आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ विशाल पट्टेकर,स्मार्ट सिटी चे सिदार्थ बनसोडे ,आरोग्य कर्मचारी ,लॅब टेक्निशियन /डॉक्टर ,वार्ड कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांचे पथक ही मोहीम राबवित आहे.