देशात सक्रिय रुग्णसंख्या घसरणीचा उतरता कल कायम

देशात गेल्या 24 तासात  दैनंदिन 1.32 लाख  नवीन रुग्णांची नोंद

नवी दिल्ली,४ जून /प्रतिनिधी:- 

सक्रिय रुग्णसंख्या घसरणीचा उतरता कल कायम, देशातील सक्रिय रुग्णसंख्या घटून 16,35,993; गेल्या सलग 8 दिवसांपासून 2 लाखांच्या खाली

गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णसंख्येत 77,420  रुग्णांची घट

देशात गेल्या 24 तासात  दैनंदिन 1.32 नवीन रुग्णांची नोंद , दैनंदिन नवीन रुग्णसंख्येचा घसरणीचा कल कायम

देशभरात आतापर्यंत, 2.65 पेक्षा जास्त रुग्ण कोविड मधून बरे झाले.

गेल्या 24 तासात 2,07,071 रुग्ण कोविडमुक्त  झाले.

सलग 22 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

वाढीचा आलेख कायम ठेवत, रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर वाढून 93.08% वर

साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर सध्या 7.27%

दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 6.38%, सलग 11 व्या दिवशी हा दर 10% च्या खाली राहिला

कोविड चाचणी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ – आतापर्यंत एकूण 35.7 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत, लसीच्या

22.41 कोटी मात्रा देण्यात आल्या.