ऑक्सीजन एक्सप्रेसद्वारे देशात 24,840 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजनचा पुरवठा

ऑक्सीजन एक्स्प्रेसने 1463 टँकर्सच्या माध्यमातून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजनचा पुरवठा करत 15 राज्यांना दिला दिलासा

नवी दिल्‍ली,४ जून /प्रतिनिधी:- 

सर्व अडथळे पार करत आणि अडचणींवर नवे उपाय शोधत   देशभरातील विविध  राज्यांना द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजन (एलएमओ)चा पुरवठा करून दिलासा देण्याचा भारतीय रेल्वेचा प्रवास सुरूच आहे.आतापर्यंत ,भारतीय रेल्वेने देशभरातील विविध राज्यांना 1,463 हून अधिक टँकर्सच्या माध्यमातून 

24,840 मेट्रीक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजनचा पुरवठा केला आहे.

याची दखल घ्यावी लागेल की, आतापर्यंत , 359 ऑक्सीजन एक्स्प्रेसने आपला प्रवास पूर्ण करत विविध राज्यांना दिलासा दिला आहे.

हे पत्रक जारी होईपर्यंत, 30 टँकर्समधून  587 मेट्रीक टनापेक्षा जास्त द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजन घेऊन जाणाऱ्या 6 ऑक्सिजन एक्स्प्रेस मार्गस्थ होऊन धावत आहेत.

ऑक्सीजन एक्स्प्रेसने देशातील दक्षिणेकडील राज्यांना 10,000 मेट्रिक टनांच्या वर द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजनचा पुरवठा केला आहे. 

दक्षिणेकडील राज्यांमधील आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांना ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून  प्रत्येकी 2,500 MT मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन (एलएमओ) प्राप्त झाला आहे.

ऑक्सीजन एक्स्प्रेसने उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड आणि आसाम अशा 15  राज्यांत ऑक्सीजनचा पुरवठा करून दिलासा दिला आहे.   

हे पत्रक जारी होईपर्यंत, ऑक्सीजन एक्स्प्रेसने महाराष्ट्रात 614 मेट्रिक टन , उत्तर प्रदेशात सुमारे 3,797 मेट्रिक टन, मध्य प्रदेशात 656 मेट्रिक टन, दिल्लीला 5,826 मेट्रिक टन, हरयाणाला 2,135 मेट्रिक टन, राजस्थानला 98  मेट्रिक टन, 2,870 मेट्रिक टन कर्नाटकला, उत्तराखंडला 320 मेट्रिक टन, तामिळनाडूला 2,711 मेट्रिक टन, आंध्र प्रदेशला 2,528 मेट्रिक टन पंजाबला 225 मेट्रिक टन , केरळला 513 मेट्रिक टन,तेलंगणाला 2,184  मेट्रिक टन,झारखंडला 38 मेट्रिक टन आणि आसामला 320 मेट्रिक टन ऑक्सीजनचा पुरवठा केला आहे.

भारतीय रेल्वेने ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी विविध मार्ग निश्चित केले आहेत आणि कोणत्याही राज्याला आवश्यकता भासल्यास त्या राज्यात ऑक्सीजनची वाहतूक करण्यासाठी स्वतःला सज्ज ठेवले आहे.

शक्य तितक्या लवकर ऑक्सिजनचा पुरवठा सुनिश्चित करून  दिलासा देण्यासाठी , ऑक्सीजन एक्स्प्रेस चालवून रेल्वे नवीन मानके आणि अभूतपूर्व मानदंड तयार करीत आहे.