भाजपाच्या आक्रोश आंदोलनाला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद

औरंगाबादेत मात्र आमदार हरिभाऊ बागडे,अतुल सावेंसहित २३ जणांवर गुन्हा 

मुंबई​,३ जून /प्रतिनिधी :-​ ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण मिळून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चातर्फे गुरुवारी राज्यभर आक्रोश आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने तातडीने मागासवर्ग आयोगाची स्थापना करावी आणि ओबीसी समाजाच्या लोकसंख्येविषयी जिल्हानिहाय सर्वेक्षण करून अहवालाच्या आधारावर आरक्षण वाचविण्यासाठी तातडीने हालचाल करावी यासह एवढ्या गंभीर प्रकरणात निष्काळजीपणा करणारे ओबीसी मंत्रालयाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली.

मुंबई येथे भाजपा प्रदेश कार्यालया जवळ प्रदेश उपाध्यक्ष आ. संजय कुटे व ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ‘ओबीसी समाजाच्‍या हक्‍कासाठी भाजपाचा लढा सुरूच राहणार’ असे प्रतिपादन करत आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे आंदोलनाचे नेतृत्व केले.

Displaying BJP PRESS PHOTO 03_1.JPG

पुणे येथे प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे व जिल्हाध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. नाशिक येथे खा. भारती पवार, आ. सीमा हिरे, जिल्हाध्यक्ष गिरीश पालवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. तर धुळे येथे आ. गिरीष महाजन यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. नाशिक येथे राज्य मागासवर्गीय आयोगाचे लवकरात लवकर गठण करून ओबिसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण पुन्हा मिळवून द्यावे अशा आशयाचे निवेदन ही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Displaying BJP PRESS PHOTO 03_3.jpeg

विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आ. प्रवीण दटके, आ.कृष्णा खोपडे, आ. रणधिर सावरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेत महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध नोंदवला. ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी ठाकरे सरकारने गांभीर्याने हे प्रकरण हाताळावे. त्यासाठी तातडीने मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी, असे निवेदन ही ठिकठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

औरंगाबादेत २३ जणांवर गुन्हा 

औरंगाबाद भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. ओबीसी समाजाला शैक्षणिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या संपवण्याचा डाव आघाडी सरकारचा आहे. तरी सरकारने त्वरित मागासवर्गीय आयोग नेमून न्यायालयासमोर बाजू मांडावी व ओबीसीला मोठ्या कष्टाने डॉ बाबासाहेब आंबेडकरनी मिळवून दिलेले आरक्षण पुर्वी प्रमाणे द्यावे या आदेशाने स्वर्गीय बहुजनाचे कैवारी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथी दिनी क्रांती चौकात आक्रोश आंदोलन करण्यात आले.

यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केनेकर,
ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस बापू घडामोडे, राजेश मेहता, समीर राजूरकर, शिवाजी दांडगे,सुहास शिरसाठ,अनिल मकरिये, गोविंद केंद्रे, राजेंद्र काळे , दिलीप थोरात, राज वानखेडे, मनीषा भन्साळी, श्री.रामेश्वर भादवे,सौ.मनीषा मुंढे श्री,ताराचंद गायकवाड, श्री.शंकर म्हात्रे, दौलतखान पठाण, ज्ञानेश्वर बोरसे, सिद्धार्थ साळवे, संजय राठोड, अशोक दामले,दीपक ढाकणे, संजय फत्तेलष्कर, राजू बुरकुल पाटील, सतीश पाटील, गीता कापुरे,वर्षाताई साळुंके, दिव्याताई मराठे, प्रतिभाताई जऱ्हाड, दिव्या पाटील, खाजेकर ताई, सौ.सविताताई घोडतुरे,आदी उपस्थित होते.

औरंगाबादेत मात्र आमदार हरिभाऊ बागडे,अतुल सावेंसहित २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोना मार्गदर्शक नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे भाजपा आमदार व अन्य २१ पदाधिकारी ,कार्यकर्ते यांच्यावर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.