शासनाच्या आदेशाचे पेट्रोलपंप चालकांनी पालन करावे- वर्षाराणी भोसले

  • नागरिकांसाठी सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू
  • अत्यावश्यक बाबी, सेवेसाठी दुपारी 2 ते सकाळी 7 पर्यंत ठराविक पेट्रोलपंप सुरू
  • आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई

औरंगाबाद,३जून /प्रतिनिधी :- कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून परवानाधारक पेट्रोलपंप चालकांनी ठरवून दिलेल्या वेळेतच नागरिकांना इंधन द्यावे. शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे. आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी पेट्रोलपंप चालकांना दिल्या आहेत.

Top Petrol Pumps in Kranti Chowk, Aurangabad-Maharashtra - Best Petrol  Filling Stations - Justdial

पेट्रोलपंप परवानाधारक चालकांनी 15 जून पर्यंत सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी इंधन भरण्यास पेट्रोलपंप सुरू ठेवावेत. तर अत्यावश्यक बाबी, सेवेसाठी पोलीस आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रातील ठरवून दिलेल्या पेट्रोलपंप चालकांनी दुपारी दोन ते सकाळी सात वाजेपर्यंत पेट्रोलपंप सुरू ठेवावेत.

पेट्रोलपंप चालकांनी पेट्रोलपंपावर इंधन वितरण करताना पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सामान्य नागरिक अत्यावश्यक बाबींकरीता इंधन घेण्यासाठी आल्यास त्यांनाही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, यासंबंधी नियमांचे पालन करून इंधन द्यावे. मनपा हद्दीबाहेरील तथापि पोलीस आयुक्तांच्या हद्दीतील सर्व पेट्रोल पंपावरील कर्मचारी, मालक, चालक, मजूर यांनी नियमितपणे मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. त्याचबरोबर इंधन भरण्यास येणाऱ्या नागरिकास मास्क परिधान करणे सक्तीचे करावे. मास्क नसल्यास इंधन देऊ नये. इंधन भरणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा. पंपावर नो मास्क, नो पेट्रोल/डिझेलचे स्टीकर लावावे. इंधन देतेवेळेस व पंप परिसरात सर्वांनी शारीरिक अंतराचे पालन करावे. इंधन वाटप करताना कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही या अनुषंगाने नियोजन करावे, अशाही सूचना श्रीमती भोसले यांनी दिल्या आहेत.

अत्यावश्यक बाबी, सेवेसाठी पोलीस आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रातील दु. 2 ते स. 7 वाजेपर्यंत सुरू असलेले पेट्रोलपंप

अ.क्र.पेट्रोल पंपाचे नावठिकाण
1कोको पेट्रोल पंपजळगाव टी. पॉईट, हर्सूल, औरंगाबाद शहर
2एन.ए. प्रिंटर पेट्रोल पंपक्रॉस रोड, बाबा पंप, महावीर चौक, औरंगाबाद शहर
3हिंद सुपर पेट्रोल पंपक्रांती चौक, औरंगाबाद शहर
4एन.ए. प्रिंटर, पेट्रोल पंपदिल्ली गेट, औरंगाबाद शहर
5पोलीस आर ओ, पेट्रोल पंपटि व्ही सेंटर, औरंगाबाद
6पोलीस आर ओ, पेट्रोल पंपचिकलठाणा, औरंगाबाद शहर
7अंबरवाडीकर एंटरप्राईजेस, पेट्रोल पंपसेव्हन हिल, औरंगाबाद शहर
8लोळगे पेट्रोलियम प्रॉडक्टस, पेट्रोल पंपरेल्वे स्टेशन रोड, बन्सीलाल नगर, औरंगाबाद शहर
9जानकी सर्वो ऐटोमोबाईल्स पेट्रोल पंप मुकुंदवाडी, औरंगाबाद शहर
10जागृत पेट्रोलियम पेट्रोल पंपसेव्हन हिल, औरंगाबाद शहर
11इसारवाडी हायवे, पेट्रोल पंपपैठण रोड, औरंगाबाद शहर
12नर्मदा ऑटो, पेट्रोल पंपबीड बायपास, औरंगाबाद शहर
13रामकृष्ण पेट्रोल पंपबीड बायपास, औरंगाबाद शहर
14एस गिरीजा समर्थ, पेट्रोल पंपशरणापूर फाटा, औरंगाबाद शहर
15औरंगाबाद शहरातील औद्योगिक वसाहतीतील व औरंगाबाद-नगर हायवे वरील पेट्रोल पंपवाळूज, बजाज नगर, पंढरपूर व इतर औद्योगिक वसाहत