शांघाय सहकार्य संघटनेच्या देशांदरम्यान “समाज माध्यमांच्या क्षेत्रातील सहकार्य” या करारावर सह्या करून मंजुरी द्यायला मंत्रिमंडळाची परवानगी

नवी दिल्ली,२ जून /प्रतिनिधी :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांदरम्यान “समाज माध्यमांच्या क्षेत्रातील सहकार्य” या विषयाशी संबंधित करारावर सह्या करून मंजुरी द्यायला परवानगी देण्यात आली. हा करार 2019 मध्ये करण्यात आला होता.

या करारामुळे समाज माध्यमांच्या क्षेत्रातील संस्थांदरम्यान समान आणि दोन्ही बाजूंना लाभदायक ठरणारे सहकार्य वाढवायला प्रोत्साहन मिळेल. प्रत्येक भागीदाराने देवाणघेवाणीच्या पायावर आधारित व्यवहारांचे सुगम परिचालन करावे जेणेकरून समानता सुनिश्चीत होईल. या करारामुळे, सदस्य देशांतील समाज माध्यमांच्या क्षेत्रातील उत्तम पद्धती आणि अभिनव संशोधन यांच्या देवाणघेवाणीची संधी उपलब्ध होईल.

वैशिष्ट्ये:

सहकार्याची मुख्य क्षेत्रे पुढीलप्रमाणे असतील:

  • संबंधित देशांतील जनतेच्या जीवनांबद्दल सखोल माहिती मिळविण्यासाठी समाज माध्यमांद्वारे या माहितीचा चौफेर आणि परस्परांमध्ये प्रसार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे.
  • संबंधित देशांतील समाज माध्यमांच्या संपादकीय कार्यालयांमध्ये तसेच समाज माध्यम क्षेत्राशी संबंधित मंत्रालये, संस्था आणि संघटना  सहकार्य वाढविण्यासाठी सहभागी देशांनी स्वतःच निश्चित केलेल्या विशिष्ट परिस्थिती आणि प्रारूप ज्यात स्वतंत्र करारांचे निष्कर्ष अंतर्भूत असतील.
  • उपलब्ध व्यावसायिक अनुभवांचा अभ्यास करण्यासाठी तसेच समाज मध्यम क्षेत्रातील बैठका, चर्चासत्रे आणि परिषदा आयोजित करण्यासाठी सर्व सदस्य देशांतील पत्रकारांच्या व्यावसायिक संघटनांदरम्यान समान आणि दोन्ही पक्षांना लाभदायक सहकार्याला प्रोत्साहन देणे.
  • दुसऱ्या बाजूच्या देशांच्या प्रदेशातील कायदेशीरपणे प्रसारित होणारे टीव्ही आणि रेडियोचे कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी मदत करणे. जर त्यांची वितरण प्रक्रिया दुसऱ्या बाजूकडील देशांच्या कायदेशीर अटींची पूर्तता करीत असेल तर संपादकीय कार्यालयांकडून साहित्य आणि माहितीचे कायदेशीर प्रसारण करणे.
  • समाज मध्यम क्षेत्रातील अनुभव आणि विशेष तज्ञांचे आदानप्रदान करणे, मध्यम व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यासाठी परस्पर सहकार्य पुरविणे आणि या क्षेत्रातील शैक्षणिक तसेच शास्त्रीय संशोधन संस्था आणि संघटना यांच्यातील सहकार्याला प्रोत्साहन देणे.