ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही;आरक्षण प्रश्नांवर आवाज उठविणार- पंकजा मुंडे

औरंगाबाद ,३१ मे /प्रतिनिधी:- ओबीसी समाजाला आरक्षण आणि योग्य प्रतिनिधीत्व मिळणार नसेल तर हा समाज राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा देत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, यावर आवाज उठविणार असल्याचे सांगितले.ओबीसींच्या आरक्षणाची बाजू मांडण्याची महा विकास आघाडी सरकारची मानसिकताच नव्हती, यात सरकार सपशेल फेल झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आज औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ओबीसींच्या आरक्षण प्रश्नांवर पंकजाताई मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

May be an image of 2 people and indoor
महानगरपालिकेच्या नगरसेविका विमल गोविंद केंद्रे यांचें सासरे व आमचा कार्यकर्ता गोविंद केंद्रे यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाल्यामुळे त्यांच्या राहत्याघरी औरंगाबाद येथे सांत्वनपर भेट घेतली.


कोर्टाचा निर्णय धक्कादायक आहे.ओबीसींना आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शांत बसणार नाही.  निवडणुका घेण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असं त्या  म्हणाल्या. आमच्या जागाच गेल्याने आम्ही वंचित राहणार असू तर निवडणुका कशासाठी घ्यायच्या? आरक्षण नसेल तर वंचित घटक मुख्य प्रवाहात कसा येईल. या निवडणुका धनदांडग्यांच्या बनून राहतील. आरक्षण नसलं तर न्यायप्रक्रियेमुळे निवडणुका होणारच नाहीत. आज सरकारची मानसिकता दिसत नाही, त्यांना मुळात बाजू मांडायचीच नव्हती, त्यामुळे आम्ही यावर आवाज उठवू. त्यामुळे पुढील निवडणुका होण्याआधीच हा ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय घ्या, अशी मागणीही त्यांनी केली.
 ओबीसींच्या आरक्षणासाठी जनगणनेची गरज नाही, इम्पिरिकल डाटा तयार करूनही ओबीसींना आरक्षण मिळेल, असंही पंकजाताई मुंडे यांनी स्पष्ट केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणा संदर्भात आम्ही सत्तेवर असताना एक अध्यादेश काढून डाटा सबमिट करण्यासाठी वेळ मागितली होती, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने २८ ऑगस्ट २०१९ रोजी दोन महिन्याची वेळ दिली होती पण नंतर आलेल्या मविआ सरकारने गेल्या १५ महिन्यांत कोणताच निर्णय घेतला नाही असे त्या म्हणाल्या. दरम्यान, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे असेही त्यांनी एका प्रश्नांवर बोलतांना सांगितले.
मुंडे साहेबांचे पोस्टल इन्व्हलप ; केंद्र सरकारचे मानले आभार

लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने भारतीय डाक विभाग मुंडे साहेबांचा फोटो असलेले  पोस्टल इन्व्हलप  येत्या 3 जून 2021 रोजी समर्पित करत आहे, याचा आपणास खूप आनंद झाला आहे.  मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्यांनी ते इन्व्हलप घेऊन  त्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना ‘सामान्य व्यक्ती ची मन की बात मोदीजी के साथ’ असे पत्र इन्व्हलपच्या माध्यमातून लिहावे असे सांगत त्यांनी याबद्दल पंतप्रधान केंद्र सरकारचे आभार मानले.