लोकनेते कै.गोपीनाथ मुंडे यांचा केंद्र सरकार कडून सन्मान

औरंगाबाद,३० मे /प्रतिनिधी:-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला सात वर्ष पूर्ण झाली असून, त्या अनुषंगाने मराठवाड्याचे आणि राज्याचे नेते दिवंगत  गोपीनाथराव मुंडे यांनी चार दशके समाजकारण आणि राजकारण करीत ,समाजातील तळागाळातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याच्या निमित्ताने तीन जून (गुरुवार) रोजी त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून स्पेशल पोस्टल कव्हर अनावरण  समारंभ  भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते दुपारी एक वाजता गोपीनाथ गडावर व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात येणार आहे,शी माहिती खा.डॉ.भागवत कराड यांनी  येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.

Image

          दिवंगत गोपीनाथ मुंडे शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन ,अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये भाजपा वाढविण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी जीवाचे रान केले. 2014 मध्ये दुर्दैवाने एका अपघातामध्ये त्यांचे निधन झालेत  ,आत्तापर्यंत त्यांनी केलेले पक्षकार्य समाजकारण आणि राजकारण लक्षात घेऊन केंद्र सरकारने तीन जून रोजी त्यांच्या सातव्या पुण्यतिथीचे औचित्य साधत स्पेशल पोस्टल कव्हर अनावरण समारंभ होणार आहे. या पोस्टाच्या कव्हरचे उदघाटन  भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा , केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या  उपस्थिती व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे.या समारोह साठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्रिमंडळातील राज्य मंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री संजय जी धोत्रे, यासह अनेक आमदार, खासदार मान्यवर उपस्थित राहणार आहे याच बरोबर केंद्रीय पदाधिकारी ,महाराष्ट्राचे पदाधिकारी ,जिल्हा अध्यक्ष ,व्हर्चुअल पद्धतीने उपस्थित राहणार आहे.तसेच या कार्यक्रमासाठी सहभागी होण्यासाठी  व्हर्चुअल लिंक तयार करण्यात येणार असून,इच्छुकांना सहभागी होता येईल आणि हा कार्यक्रम फेसबुक लाइव्ह देखील असणार आहे. यामध्ये आयोजक पंकजा मुंडे , खासदार प्रीतम मुंडे या परळी येथून गोपीनाथ गडावर उपस्थित राहतील.

 कै.गोपीनाथ मुंडे हे सर्व मान्य नेते होते, त्यांनी भा.ज.पा. ला सामान्य माणसाचा चेहरा मिळवून दिला.समाजातील अनेक लहान मोठ्या दुर्बल ,वंचित घटकाला न्याय देण्यासाठी त्यांनी जीवनाच्या शेवटपर्यंत लढा दिला व संघर्ष केलात.डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  नामविस्तारसाठी देखील सहभागी झाले होते. त्यांनी सामाजिक आणि राजकीय प्रश्नावर अनेक आंदोलने केलीत व समाजाला न्याय मिळवून दिला.त्यामुळे त्यांचे हे सामाजिक कार्य अविस्मरणीय आहे.त्यामुळे केंद्र सरकार कडून त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांच्या नावाने पोस्टल स्पेशल कव्हर निघत आहे.या वेळी आ.अतुल सावे,प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रविण घुगे,अनिल मकरिये,सरचिटणिस राजेश मेहता,प्रा.डॉ.राम बुधवंत आदि उपस्थित होते.