कारेगाव शिवारात विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनरक्षक शेळके यांनी दिले जीवदान !

लोहा  ,२४ मे /प्रतिनिधी:-वनविभाग आता वन्यजीवचा विषयी सजग झाला आहे .या  परिसरात हरीण, मोर , यासह वन्यजीव संकटात सापडले तर वनविभाग तात्काळ मदतीला धावत आहेत असा अनेक घटनांतून समोर आले अशीच एक घटना कारेगाव शिवारात रविवारी सकाळी आठ वाजता घडली.पन्नास फूट खोल विहिरीत पडला  वनरक्षक लक्ष्मण शेळके यांनी  स्वतः  धोका पत्करून  त्या कोल्ह्याचा जीव वाचविला.

लोहा जवळ असलेल्या  कारेगाव शिवारात पन्नास फूट खोल  विहिरीत  कोल्हा पडला  याची माहिती  सुधाकर पाटील किरवले यांनी वनविभागाला कळविली.रविवारी सकाळी 8.00 नांदेड चे  उपवनसंरक्षक आर ए सतेलिकर , सहायक वन संरक्षक डी एस पवार , वनपरिक्षेत्र अधिकारी नांदेडचे ,श्रीधर कवळे,नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी अशोक. एस. क्यादरवाड,  वनरक्षक एल एन शेळके , वनसेवक एन. सी. शेवडीकर  यांनी स्वतः दोरी , बाज , जाळे घेऊन विहिरीमध्ये उतरले. वनरक्षक लक्ष्मण शेळके यांनी जीव धोक्यात घातला व कोल्ह्याला वाचविले.

Displaying IMG_20210523_123227.jpg

अवघड ठिकाणी दोरीच्या सहाय्याने बाजेचा वापर करून तो कोल्हा सुखरूप काढला .बाहेर येताच त्या कोल्ह्याने धूम ठोकली.या साठी दिलीप पाटील किरवले, सुधाकर  किरवले, बालाजी  दिघे माणिक  मोरे , सत्यवान पाटील , लक्ष्मण गुर्दले, अंगद मोरे, श्रवण किरवले रमेश मोरे माधव मोरे शिवगण लिंबोटकर यांनी सहकार्य केले वनरक्षक लक्ष्मण शेळके यांनी यापूर्वीही असेच जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य वाजवत वन्यजीव प्राण्याचा जीव वाचविला आहे.