तहसीलदार स्कुटीवरून आले ; पेनूरमध्ये केले वाळूचे 9 ट्रॅक्टर जप्त ,वाळु माफियांचे धाबे दणाणले

लोहा ,२४ मे /प्रतिनिधी:-

लोहा तालुक्यात पेनूर येथे वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे .पोलिसांच्या हप्तेगिरी व महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध त्यामुळे याभागात वाळूचा बेसुमार उपसा गेल्या दहा वर्षां पासून सुरू आहे.पण “निर्मळ ” प्रशासन असलेले तहसीलदार परळीकर यांनी भल्या सकाळीच ” स्कुटी” वरून गोदाकाठी गेले तेथे  अवैध वाळू वाहून नेणाऱ्या  नऊ ट्रॅकटवर धाड टाकली व ते  जप्त केले.

Displaying IMG_20210523_195936.jpg

शनिवारी तीन ट्रॅक्टर वर कार्यवाही करण्यात आली .पेनूरच्या स्वयं घोषित कार्यकर्त्यांला या धाडीमुळे मोठी चपराक बसली.लोहा तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून पेनूर,भारसावडा, चित्रावाडी, अंतेश्वर, येळी, हातणी, कौडगाव , शेवडी, कपिलेश्वर बेटसांगवी  ठिकाणांहून  गोदावरी नदी पात्रात पाणी असतानाही  वाळू माफिया  बिहारी मजूर लावून तराफे,व टोकऱ्या च्या साहाय्याने  हजारो ब्रास वाळू उपसा करीत आहेत सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भाग येतो पण ठरलेल्या हप्त्यामुळे ही वाळू वाहतूक सर्रास सुरू असते.  हायवा  (टिप्पर) द्वारे वाहातूक करून जादा दराने लातूर, जळकोट, उदगीर सह तालुक्यात अव्वाच्या सव्वा दराने विक्री केली जाते . बिहारी मजूर लावून तराफे व टोकऱ्या च्या सहायाने टॅक्टरद्वारे काढलेली रेती जमा करून जेसीबी च्या सहायाने हायवा व टिप्पर द्वारे वाहातूक होत आहे. पेनूरभागात वाळू  -बाळू ने धुमाकूळ घातला आहे .   

तहसीलदार परळीकर यांनी रविवारी भल्या सकाळी” स्कुटी ‘वरून पेनूर भागात गेले तेथे  सोबत ,नायब तहसीलदार अशोक मोकले, तलाठी जाधव, तलाठी इंगळे, कांबळे,बोडावार, यांच्या पथकाने   गोदा काठावरील  वाळू उपसा करणारे   नऊ ट्रॅक्टर वर त्यांनी धाड टाकली व ते जप्त  केले.  स्कुटी वर जाऊन तहसीलदार यांनी केलेल्या कार्यवाही मुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत दुसरीकडे  उपविभागीय अधिकारी कंधार हे गोदाकाठी गेल्या नंतर पात्रातील तरफे जाळतात .ट्रॅक्टर , हायवा वर कार्यवाही का करीत नाहीत  अशी अर्थपूर्ण चर्चा सुरू आहे       

पेनूर येथील धाडीमुळे हप्तेखोरी ला चपराक मानली जाते .अवैध रेती  वाहतुकी विरुद्धच्या कार्यवाहीमुळे अनेकांनी पळ काढला   . तहसीलदार यांच्या कार्यवाहीमुळे शिवाजी चौकात ‘जागते  रहो “..म्हणून पहारा देणाऱ्या वाळू माफियांत खळबळ उडाली आहे.दुटका ( ता पालम) येथे अधिकृत वाळू धक्का सुटला आहे पण चोरीच्या वाळू उपशामुळे लाखो रुपये महसूल भरणाऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे रेतीचे नऊ ट्रॅक्टर  तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.तहसीलदार यांच्या “स्कुटी पॅटर्न “मुळे बातमी ” लिकीज ” करणाऱ्याची मोठी फजिती झाली.ग्रामीण नांदेड -सोनखेड पासून ते कंधार विभाग पर्यन्त फोनफोनी झाली पण स्वच्छ प्रतिमेच्या तहसीलदार यांच्या धाडीमुळे ‘ हप्ता” फेल झाला अशी जोरदार चर्चा सुरू आहे