शहरी भागात संक्रमण पसरण्याची शक्यता,मृत्यू दरात वाढ

Health Minister Dr Harsh Vardhan reviews preparedness for Covid-19 management in Maharashtra through VC

नवी दिल्ली, 11 जून 2020

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि महाराष्ट्रातल्या कोविड -19 बाधित जिल्ह्यांच्या दंडाधिकाऱ्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्च स्तरीय बैठक घेतली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव प्रीती सुदान,यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.या अध्ययनात, लॉकडाऊनच्या काळात, केलेल्या उपाययोजनांमुळे संक्रमण कमी करण्यात आणि कोविड नियंत्रणात ठेवण्यात यश आल्याचेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. आयसीएमआरच्या निष्कर्षानुसार, ग्रामीण भागाच्या तुलनेत,शहरी भागात हे संक्रमण पसरण्याची शक्यता, 1.09 पट अधिक आहे, तर शहरी भागातील झोपडपट्यामध्ये हा धोका 1.89 पट अधिक आहे. संसर्गित रुग्णांचा मृत्यूदर 0.08% आहे. याचा एक अर्थ असाही आहे की लोकसंख्येच्या मोठ्या भागाने अद्याप कोविड बाबतीतली सर्व काळजी घेणे आणि नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

राज्यातले सर्व 36 जिल्हे बाधित आहेत. डॉ हर्ष वर्धन यांनी वैयक्तिकरित्या  संवाद साधत मुंबई, ठाणे, पुणे,नाशिक, पालघर, नागपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोविड-19 स्थितीचा आणि त्याबाबतच्या व्यवस्थापनाचा आढावा घेतला. राज्यातले सर्व जिल्हे या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधे जोडण्यात आले होते.

एनसीडीसीचे संचालक डॉ एस के सिंग यांनी महाराष्ट्रातल्या कोविड-19 स्थितीचे सादरीकरण केले, यात सक्रीय रुग्ण जास्त संख्येने असलेले,मृत्यू दर, रुग्ण दुपटीचा काळ, चाचण्या कमी संख्येने असलेले जिल्हे ठळकपणे दर्शवण्यात आले.आरोग्य पायाभूत संरचना उपलब्धता आणि रुग्णसंख्या जास्त असलेले मृत्यू दर या पार्श्वभूमीवर जास्त लक्ष पुरवण्याची आवश्यकता असणारे जिल्हे याबाबतही सादरीकरण करण्यात आले.

महाराष्ट्रातल्या कोविड-19 बाबतच्या सध्याच्या स्थितीविषयी बोलताना डॉ हर्ष वर्धन यांनी, प्रतिबंधित क्षेत्रांच्या वाढत्या संख्येकडे   तातडीने लक्ष पुरवण्याची आवश्यकता व्यक्त केली. प्रभावी प्रतिबंध धोरणासाठी दाट लोकवस्तीच्या भागात, प्रादुर्भाव लगेच होऊ शकण्यासंदर्भात  म्यापिंग करण्यात यावे. मृत्यू दरात वाढ होत असल्याकडे लक्ष पुरवतानाच प्रती दशलक्ष लोकसंख्येत करण्यात येणाऱ्या चाचण्यांकडेही लक्ष  द्यायला हवे असे हर्ष वर्धन म्हणाले.

आरोग्य पायाभूत सुविधाबाबत बोलताना डॉ हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्रातली आयसीयू, व्हेंटीलेटर आणि निदान प्रयोगशाळा यंत्रणा बळकट करण्याच्या सूचना देतानाच येत्या काळातल्या रुग्णांसाठीही आयसीयू उपलब्धता सुनिश्चित करावी असे सांगितले. मनुष्यबळ व्यवस्थापनाबाबत बोलताना, आरोग्य कर्मचाऱ्याना, ऑनलाईन प्रशिक्षण मोड्यूल द्वारे दर्जेदार प्रशिक्षणाद्वारे आरोग्य सेवेचा दर्जा उंचावावा असे ते म्हणाले.

कोविड-19 चे तत्पर निदान आणि व्यवस्थापन व्हावे यासाठी प्रयोगशाळानी कोविड-19 चाचण्यांचे निदान अहवाल तत्परतेने द्यावेत याची खातरजमा करावी असे त्यांनी राज्याच्या अधिकाऱ्यांना सांगितले. 602 सरकारी आणि 235 खाजगी अशा एकूण 837 प्रयोगशाळा मार्फत आपली चाचण्यांची क्षमता वाढवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत 5,21,340  नमुन्यांच्या चाचण्या झाल्या असून  गेल्या 24 तासात 1,51,808 चाचण्या झाल्याची माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत 136 लाख एन 95 मास्क,आणि 106 लाखाहून अधिक पीपीई राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थाना पुरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बिगर कोविड रूग्णालयात पीपीई चा, मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून  सुयोग्य वापर सुनिश्चित करायला हवा याकडे त्यांनी लक्ष वेधले.

संपर्कातल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी, मनुष्यबळ दृढ करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.  व्हेंटीलेटरसह आयसीयू खाटा, ऑक्सिजन सुविधेसह  खाटा मधे वाढ, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक  सुनिश्चित करण्यावर त्यांनी भर दिला. याशिवाय जिल्ह्यांनी प्रतिबंधात्मक आराखड्याची कठोर अंमलबजावणी सुनिश्चित करणे महत्वाचे आहे. त्याबरोबरच महत्वाच्या बाधित क्षेत्रातून येणाऱ्या व्यक्तींसाठी कडक विलगीकरण याचीही खातरजमा करणे आवश्यक आहे.

आवश्यक आरएमएनसीएचए + एन  सेवा  विशेषकरून गरोदर महिलांसाठीच्या सेवा, रक्त नमुने संकलन, केमोथेरपी, डायलिसीस यासारख्या सेवांकडे लक्ष पुरवण्याच्या सूचना राज्याला देण्यात आल्या. टीबी निदान आणि व्यवस्थापन यासाठीच्या आवश्यक सेवा सुनिश्चित करणे आवश्यक आहे  कारण या रुग्णांना कोविड-19 चा धोका जास्त राहतो.कोविड-19 साठीच्या सर्वेक्षणा बरोबरच  टीबी रुग्ण शोधण्यासाठी   घरोघरी जाऊन सर्वेक्षण व्हायला हवे असे हर्ष वर्धन म्हणाले. प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याला प्रतिबंध करण्यासाठी कठोर कारवाई हवी असेही ते म्हणाले.

या सेवा देण्यासाठी राज्याच्या अधिकार्यांनी राज्यात कार्यरत असलेल्या  आयुष्मान भारत आरोग्य आणि वेलनेस सेन्टरच्या 3,775 केंद्राच्या जाळ्याची मदत घेण्याचे सुचविण्यात आले. बाह्य रुग्ण सेवेसाठी टेलीमेडिसिन आणि घरोघरी सेवा  पोहोचवण्यासाठी  स्वयंसेवकांची मदत घेण्याचे सुचवण्यात आले. आरोग्य कर्मचार्यांचे वेतन वेळेवर मिळेल  याची सुनिश्चिती करण्या बरोबरच आवश्यक औषध साठ्या बरोबरच तात्पुरते मनुष्य बळ नेमण्याचे आवाहनही करण्यात आले. कोविड-19 साठी लस आणि औषधासाठी अनेक चाचण्या सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-19 ला प्रतिबंध करण्यासाठी आपण उत्तम प्रथांचा अंगीकार करायला हवा.सर्व जिल्हेआणि महापालिका प्रशासन अधिकाऱ्यांनी राज्य आणि केंद्र सरकारशी समन्वयाने काम करायला हवे असे त्यांनीसांगितले.

केवळ 0.73 टक्के लोकांना कोविड-19 चा संसर्ग

नवी दिल्ली, 11 जून 2020

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद-आयसीएमआर ने केलेल्या सीरो सर्वेक्षण म्हणजेच रक्तचाचणी अध्ययनात असे आढळले आहे की एकूण तपासलेल्या नमुन्यांमधील 0.73 टक्के लोकांना याआधी सार्स-कोविड-2 चा संसर्ग झाल्याचे पुरावे आढळले आहेत. आयसीएमआर चे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

आयसीएमआर ने मे 2020 मध्ये, राज्य आरोग्य विभाग, एनसीडीसी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने, कोविड-19 साठीचे पहिले सेरो सर्वेक्षण घेतले होते. या अंतर्गत, 83 जिल्ह्यातील 28,595 कुटुंबे आणि 26,400 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले. या अध्ययनाचे दोन भाग असून प्राथमिक पातळीवर, एकूण सर्वसामान्य लोकसंख्येपैकी, लोकसंख्येचा असा भाग अंदाजे वेगळा काढला गेला, ज्यांना सार्स-कोविड-2 ची बाधा झाली होती, हे काम पूर्ण झाले आहे आणि अध्ययनाच्या दुसऱ्या भागात, प्रतिबंधित क्षेत्र किंवा हॉट स्पॉट मधील लोकसंख्येचा असा भाग वेगळा काढण्यात आला ज्यांना सार्स-कोविड-2ची बाधा झाली, हे काम प्रगतीपथावर आहे.

गेल्या 24 तासांत, देशभरात कोविडचे 5,823 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1,41,028 वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आता 49.21% इतका झाला आहे. सध्या देशात, 1,37,448 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या, सक्रीय रूग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या अधिक आहे.

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्रात बुधवारी कोविडच्या 3254 नवीन रुग्णांची नोंद झालीयामुळे राज्यात एकूण रुग्णसंख्या 94,041 इतकी झाली आहे. राज्यात 46,074 सक्रिय रुग्ण असून 44,517 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात बुधवारी या आजारामुळे 149 मृत्यू झाले असून आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. मुंबईतही बुधवारी कोविडचे 1567 नवीन रुग्ण आढळले असून 97 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोविड19 ची रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याच्या दरातही सुधारणा होत आहे तसेच मृत्यू दरही राष्ट्रीय सरासरी दराएवढाच झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आणि धारावीमाहीम आणि दादर या कोविडचे हॉटस्पॉट बनलेल्या ठिकाणी परिस्थितीत होत असलेली सुधारणा यामुळे राज्य सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *