नांदेड जिल्ह्यात 103 व्यक्ती कोरोना बाधित ; 7 जणाचा मागील तीन दिवसात मृत्यू

नांदेड ,२३ मे /प्रतिनिधी :-जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 234 अहवालापैकी 103 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 57 तर अँटिजेन तपासणीद्वारे 46 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 87 हजार 999 एवढी झाली असून यातील 84 हजार 52 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 664 रुग्ण उपचार घेत असून 69 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिनांक 21 मे 2021 रोजी नारायणा कोविड रुग्णालयात शिवाजीनगर नांदेड येथील 76 वर्षाचा पुरुष, दि. 22 मे रोजी क्रिटिकल केअर कोविड रुग्णालयात भाग्यनगर नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उमरी येथील 65 वर्षाचा पुरुष, सिडको नांदेड येथील 55 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे माहूर तालुक्यातील असनी येथील 65 वर्षाचा पुरुष, मुखेड कोविड रुग्णालयात नायगाव तालुक्यातील रातोळी येथील 60 वर्षाचा पुरुष तर दि. 23 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे वजिराबाद नांदेड येथील 70 वर्षाच्या पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 852 एवढी आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 13, देगलूर तालुक्यात 5, किनवट 4, मुखेड 3, कोल्हापूर 1, नांदेड ग्रामीण 5, धर्माबाद 5, लोहा 7, नायगाव 2, अर्धापूर 1, हदगाव 3, माहूर 1, परभणी 1, बिलोली 1, हिमायतनगर 3, मुदखेड 1, हिंगोली 1 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 12, हदगाव तालुक्यात 4, माहूर 1 अर्धापूर 5, कंधार 2, मुदखेड 7, भोकर 1, किनवट 4, मुखेड 2, बिलोली 1, लोहा 1, नायगाव 4, उमरी 2 असे एकूण 103 बाधित आढळले.

आज जिल्ह्यातील 155 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 12, हदगाव कोविड रुग्णालय 4, अर्धापूर तालुक्यांतर्गत 29, लोहा तालुक्यांतर्गत 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 8, मुदखेड कोविड केअर सेंटर 6, बिलोली तालुक्यांतर्गत 1, खाजगी रुग्णालय 20, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 50, मांडवी कोविड केअर सेंटर 4, धर्माबाद कोविड केअर सेंटर 4, किनवट कोविड रुग्णालय 15 या व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.आज 1 हजार 664 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 13 हजार 564

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 15 हजार 37

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 87 हजार 999

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 84 हजार 52

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 852

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.51 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-10

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-50

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-224

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 664

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-69