लोह्यात संतप्त शेतकऱ्यांनी वाढीव मावेजासाठी राष्ट्रीय महामार्ग वळण रस्त्याचे काम बंद पडले

लोहा ,२३मे /प्रतिनिधी :-

लोहा शहरा जवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३६१ वळण रस्त्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना मंजूर झालेला वाढीव गुणांक अद्यापही मिळालेला नाही .तर दुसरीकडे उपविभागीय अधिकारी यांच्या अर्थ’पूर्ण कारभारामुळे हे शेतकरी त्रस्त झाले आहेत .आधी वाढीव गुणांक नुसार मावेजा घ्या मग काम करा असे निक्षूण  बजावत शेतकऱ्यांनी वळण रस्त्याचे  काम बंद पाडले 

राष्ट्रीय महामार्ग 361 लोहा वळण रस्ता शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष माणिकराव मुकदम यांच्या उपस्थितीत   बैठक पार पडली वाढीव मावेजा जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत वळण रस्त्याचे काम सुरू होऊ देणार नाही असा निर्धार या वळण रस्त्यात जमिनी जाणाऱ्या ३०६ भूधारकांनी केला. 
प्रत्यक्षात सदरील वळण रस्त्यात संपादित होत असलेल्या सर्व जमिनीचा सुधारित गुणांक नुसार मावेजा बाधित शेतकऱ्यांना मिळालेला नाही.तसेच पुरवणी जाहीर प्रगटन  काढून संपादित होत असलेल्या जमिनीचा मावेजा सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही. कंधार चे उपविभागीय अधिकारी पी एस बोरगावकर यांच्याकडे  चौकशी केली असता  प्रस्तावित असल्याचे  सांगून शेतकऱ्यांची हेटाळणी करतात.त्यांच्या ऑफिस मधील  कोणतेही काम – दाम दिल्याशिवाय होत नाही असा उघडउघड आरोप संतप्त भूधारकांनी केला ,

वाढीव मावेजा आठ दिवसात मिळणार असे या भागातील आमदारांनी बातम्या देऊन जाहीर केले पण दुसरा सप्टेंबर येतोय तरीसुद्धा वाढीव गुणांक नुसार आम्हा शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाहीअसा रोष व्यक्त केला   शनिवारी सकाळीच वळण रस्त्या बाधित शेतकरी बेरळी फाटा येथे कामावर गेले त्यांनी एरिया मॅनेजर यांना भूधारक शेतमालकांचे काय मागणी आहे ? कशासाठी संघर्ष सुरू आहे हे उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांनी  अवगत केले आणि काम बंद पडले.यावेळी   नगरसेवक संभाजी चव्हाण, राजेश मुकदम, सचिन मुकदम, सुधाकर पवार  गोपीनाथ पवार, नारायण पाटील,  चव्हाण, दशरथ पवार, गजानन चव्हाण, वैजनाथ पवार श्रीराम चव्हाण नागनाथ चव्हाण यासह शेतकरी उपस्थित होते.

Displaying IMG-20210522-WA0037.jpg
केंद्रीय मंत्री गडकरी व मावेजा  न मिळालेल्या शेतकऱ्यांची लवकरच बैठक-खा चिखलीकर

लोहा शहराच्या पूर्वेकडून जाणाऱ्या वळण रस्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना वाढीव गुणांक प्रमाणे मावेजा मिळाला पाहिजे त्यांची मागणी रास्त असून या संदर्भात लवकरच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व लोह्यातील शेतकरी बांधब यांची बैठक होणार असून या सर्व शेतकऱ्यांना मावेजा मिळावा यासाठी मी वचनबद्ध आहे असा विश्वास जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शिष्टमंडळास दिला   लोहा शहराच्या पूर्वेकडून जाणाऱ्या वळण रस्त्यासाठी ३४ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली परंतु ग्रामीण भागा पेक्षाही या शेतकऱ्यांना त्याचा मावेजा कमी मिळाला आमदार असताना प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दोन गुणांक प्रमाणे मावेजा मिळावा यासाठी प्रयत्न केले होते ती मागणी मंजूर झाली पण मावेजा अद्याप मिळाला नाही. या रस्त्यात शेत -जमिन जाणाऱ्या शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष माणिकराव मुकदम, लक्ष्मराव संगेवार ,शेषराव पाटील चव्हाण यासह प्रमुखांची बैठक झाली त्यात ठरल्या प्रमाणे आज जिल्ह्याच्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर याना वाढीव मावेजा  मिळे पर्यन्त रस्त्याचे काम बंद आंदोलन सुरू केले त्या संदर्भाने निवेदन देण्यात आहे .

Displaying IMG-20210522-WA0034.jpg

माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम , उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, नगरसेवक दता वाले , व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण नगरसेवक संभाजी चव्हाण,,  हायवे चे अभ्यासक राजेश मुकदम,, सुधाकर पाटील पवार  सचिन  मुकदम ,  गजानन  चव्हाण, संग्राम चव्हाण, पवार यासह अनेक शेतकरी उपस्थित होते    शेतकरी शिष्टमंडळाने खा.चिखलीकर  यांची भेट घेतली सविस्तर माहिती दिली .प्रतापरावांनी वाढीव गुणांक साठी केलेले प्रयत्न याची आठवण सांगितली  सर्वांच्या समोर ते केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भ्रमणध्वनी वरून बोलले .लवकरच या वळण रस्ता बाधित झालेल्या व योग्य मावेजा न मिळालेल्या जमीनधारकांची  व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बैठक होईल त्यात हा मार्ग निकाली निघणार असे या शिष्टमंडळास खा.प्रतापराव पाटील यांनी आश्वासित केले.