परभणी:कोविड केअर सेंटरच्या ऑक्सिजन प्लांटच्या लहान पाईपचा अचानक स्फोट

No photo description available.
ऑक्सिजन निर्मिती प्लांटला कुठलीही हानी नाही- जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर
खासदार जाधव, आमदार डॉ राहुल पाटील यांनी केली पाहणी

परभणी,२२मे /प्रतिनिधी :- जिल्हा परिषदेच्या नवीन इमारती मधील कोविड केअर सेंटरच्या ऑक्सिजन प्लांटच्या लहान पाईपचा अचानक स्फोट झाला. ही माहिती समजताच खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर, अप्पर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्घटनाग्रस्त ऑक्सिजन  प्लांटची तात्काळ धाव घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

May be an image of 1 person and indoor

जिल्हा परीषदेच्या नविन इमारतीमध्ये द्रवरुप ऑक्सिजन  पुरवठा करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वीत केलेली आहे. याव्दारे रुग्णांना ऑक्सिजन  पुरवठा करण्यात येत आहे. अतिरीक्त व्यवस्था म्हणून कोरोनाबाधीत रुग्णांना ऑक्सिजन  पुरवठा करण्यासाठी या इमारतीच्या बाहेरील जागेत दि .14 मे 2021 रोजी पासून ऑक्सिजन  निर्मिती प्रकल्प कार्यान्वीत करुन त्याव्दारे ऑक्सिजन  पुरवठयाची पर्यायी यंत्रणा कार्यान्वित  करण्यात आली आहे. या ऑक्सिजन निर्मीती प्रकल्पास सायलेंसर बसविण्यात आला असून त्याव्दारे आवाजावर नियंत्रण मिळविण्यात आले आहे .

May be an image of one or more people, people standing and outdoors

दि .22 मे 2021 रोजी या सायलेन्सरच्या आवरणावर विसर्ग करण्यासाठी त्यावर पीव्हीसी पाईप टाकून विसर्ग बाहेर सोडण्याचे काम सुरु होते व त्यामूळे ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प बंद होता. पाईप सायलेन्सरवर टाकल्यावर प्रकल्प पुन्हा सूरु करण्यात आला मात्र त्यावेळी यंत्रणेच्या अशुध्द हवा विसर्गाच्या ठिकाणी बसविण्यात आलेला पीव्हीसी पाईप अधिक गरम होवून त्यातून धूर निघाला.

May be an image of indoor

त्याचा मोठा आवाज झाल्याचे निदर्शनास आल्याबरोबर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प बंद केला गेला व तात्काळ कोरोना रुग्णांना द्रवरुप ऑक्सिजन टँक मधून ऑक्सीजन पूरवठा सुरळीत चालू केला. जिल्हा परीषद कोविड हॉस्पीटल मधील कोरोना रुग्णांना द्रवरुप ऑक्सिजनचा पूरवठा होत आहे. ऑक्सिजन प्रकल्पाची हानी झालेली नसून प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी महावितरणचे तांत्रिक अधिकारी घटनास्थळी दाखल असून त्यांच्या तांत्रिक सल्यानुसार प्रकल्प त्वरीत चालू करण्याची कार्यवाही केली जात आहे.