नांदेड जिल्ह्यात 169 व्यक्ती कोरोना बाधित,7 जणाचा मागील दोन दिवसात मृत्यू

नांदेड ,२२मे /प्रतिनिधी :-

जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 275 अहवालापैकी 169 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 106 तर अँटिजेन तपासणीद्वारे 63 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 87 हजार 896 एवढी झाली असून यातील 83 हजार 897 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 845 रुग्ण उपचार घेत असून 63 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिनांक 21 मे 2021 रोजी भगवती कोविड रुग्णालयात हिमायतनगर तालुक्यातील डोल्हारी येथील 68 वर्षाची महिला, हदगाव कोविड रुग्णालयात मनाठा येथील 45 वर्षाचा पुरुष, शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे हदगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील 59 वर्षाचा पुरुष, माहूर येथील 60 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे भोकर येथील 58 वर्षाची महिला, नांदेड येथील 55 वर्षाचा पुरुष तर दिनांक 22 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे किनवट तालुक्यातील शिरणी येथील 70 वर्षाची महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 845 एवढी आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 45, देगलूर 11, कंधार 2, नायगाव 2, लातूर 1, नांदेड ग्रामीण 7, धर्माबाद 2, लोहा 3, उमरी 4, यवतमाळ 1, अर्धापूर 4, हदगाव 4, माहूर 1, हिंगोली 5, वाशिम 1, भोकर 4, हिमायतनगर 1, मुखेड 5, परभणी 3 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 15, देगलूर 3, किनवट 3, नायगाव 3, मुदखेड 6, नांदेड ग्रामीण 1, धर्माबाद 4, लोहा 1, उमरी 1, अर्धापूर 4, हदगाव 3, माहूर 3, हिंगोली 2, बिलोली 8, हिमायतनगर 2, मुखेड 3, परभणी 1 असे एकूण 169 बाधित आढळले.

आज जिल्ह्यातील 205 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 5, हदगाव कोविड रुग्णालय 1, मुखेड कोविड रुग्णालय 5, अर्धापूर तालुक्यांतर्गत 22, भोकर तालुक्यांतर्गत 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 8, नायगाव तालुक्यांतर्गत 4, मुदखेड कोविड केअर सेंटर 10, बिलोली तालुक्यांतर्गत 17, खाजगी रुग्णालय 53, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जंम्बो कोविड सेंटर 71, उमरी तालुक्यांतर्गत 2, धर्माबाद कोविड केअर सेंटर 2, लोहा तालुक्यांतर्गत 2 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.आज 1 हजार 725 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 12 हजार 130

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 13 हजार 954

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 87 हजार 896

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 83 हजार 897

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 845

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.45 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-45

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-236

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 725

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-63