औरंगाबाद शहरातील 26 आस्थापनांवर  कारवाई,जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांची संयुक्त पाहणी दौरा

औरंगाबाद, ,२१ मे /प्रतिनिधी:- 

कोरोना  विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्या करीता राज्य शासनाने Break The Chain अंतर्गत अनेक नियम घालुन दिले आहेत. परंतु जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुकाने व आस्थापना ह्या नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आल्याने आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता  यांनी आज सकाळी 9.00 वाजता उपजिल्हाधिकारी, कामगार उप आयुक्त महानगरपालीका व महसुल अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत उपजिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली विशेष भरारी पथके तयार करुन दुकाने व आस्थापना ( अत्यावश्यक सेवेतील आस्थापना वगळून) चालू राहणार नाही याची खबरदारी घेऊन त्यावर कार्यवाही करण्यासाठीच्या सुचना दिल्या.

Displaying 1.jpeg

           या बैठकीनंतर स्वत: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी शहरातील शहागंज, किराडपुरा, जालना रोड अशा अनेक ठिकाणी पाहणी दौरा करुन नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या दुकानांवर आणि आस्थापनांवर कारवाई केली.

          विशेष भरारी पथकात कामगार उप आयुक्त, औरंगाबाद कार्यालयातील अधिकारी, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागातील अधिकारी, महसुल विभागातील अधिकारी, महानगर पालीकेतील कर्मचारी व पोलीस खात्यातील त्या त्या क्षेत्रातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता.

Displaying 2.jpeg

          सदर पथकाने सकाळी 9.30 ते 1.00 वाजेपर्यंत त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात गस्त घालुन पुढील 24 आस्थापना सिल केल्या.

1राज क्लॉथ्‍ स्टोअर्सजालना रोड, औरंगाबाद
2गजानन गिफ्ट ॲन्ड टॉईजजालना रोड, औरंगाबाद
3शिवानी ज्वेलर्सजालना रोड, औरंगाबाद
4हार्डवेअर कलेक्शनजालना रोड, औरंगाबाद
5हिल्स लाईट ॲन्ड इलेक्ट्रीकल्ससेव्हन हिल, जालना रोड, औरंगाबाद
6जीवन तायडे फोटो लॅबनिराला बाजार सिटी बँके,समोर, औरंगाबाद
7सुनील पांडे फोटो लॅबनिराला बाजार सिटी बँके,समोर, औरंगाबाद
8सुभाष जैन फोटो लॅबनिराला बाजार, सिटी बँकेसमोर,औरंगाबाद
9प्रॉमीस स्टेशनरीनिराला बाजार पैठण गेट रोड,औरंगाबाद
10कसबेकर झेरॉक्स ॲन्ड स्टेशनरीनागेश्वरवाडी,औरंगाबाद
11गणेश दुध्‍ डेअरीनागेश्वरवाडी, औरंगाबाद 
12रत्नागिरी मँगो हाऊसनागेश्वरवाडी, औरंगाबाद
13कृष्णाई केक ॲन्ड डेली निडसनागेश्वरवाडी, औरंगाबाद
14अशोका इंटरप्रायजेस मल्टी सर्व्हिसेसमुकुंदवाडी रोड, औरंगाबाद
15बालाजी इलेक्ट्रीकल्समुकुंदवाडी रोड,औरंगाबाद
16सार्थक भुजंगराव वाघ शेगाव कचोरी सेंटरजैस्वाल हॉल समोर, टी व्ही सेंटर, औरंगाबाद
17प्रमोद कांतीलाल जैन महाविर मार्टस( किराणा शॉप)जैस्वाल हॉल समोर, टी व्ही सेंटर, औरंगाबाद
18संतोष नामदेव म्हस्के सहारा मल्टी सर्वीसेसजैस्वाल हॉल समोर, टी व्ही सेंटर, औरंगाबाद
19नृसिंह युनिफॉर्म शुटींग शर्टींग सेंटरमहाराणा प्रताप चौक, बजाजनगर, औरंगाबाद
20ओम कलेक्शनमोहटा देवी चौक, बजाजनगर,औरंगाबाद
21तिरुमला साडी सेंटरमोहटा देवी चौक, बजाजनगर,औरंगाबाद
22महावीर ज्वेलर्समोहटा देवी चौक, बजाजनगर,औरंगाबाद
23आनंद इलेक्ट्रीकल्सधमन कॉम्प्लेक्स, महावीर चौक, वाळूज, औरंगाबाद
24चिंतामणी ॲल्युमिनीअम ॲन्ड ग्लासधमन कॉम्प्लेक्स, महावीर चौक,वाळूज, औरंगाबाद
25जुवेरिया क्रॉकरी कलेक्शनकिराडपुरा, औरंगाबाद
26रमजान भाई प्लॉटींग ऑफीसकिराडपुरा, औरंगाबाद

अन्न व औषधी प्रशासनाने संस्कृती फास्ट फुड सेंटर, कॅनॉट प्लेस, सिडको,औरंगाबाद आणि हर्ष मेडिकल एमजीएम गेट समोर, सिडको,औरंगाबाद या  आस्थापनेस कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव संपेपर्यंत अन्न पदार्थ विक्री करण्यास प्रतिबंध केलेला आहे.

राज्य शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी दिलेल्या नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी 16 आस्थापना मालकाकडुन रु. 1,25,000/- इतका दंड वसुल करण्यात आलेला आहे.