जालना जिल्ह्यात 382 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना ,२१ मे /प्रतिनिधी:-

जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 240 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआरद्वारे 421 तर अँटीजेन तपासणीद्वारे 67 असे एकुण 488 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 60884 असुन सध्या रुग्णालयात- 1814 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 12631, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 7465, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-334224 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-382, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 58295 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 273497 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2100, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -46413 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 71,

14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-11234 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 13, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 428 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-51, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1814,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 26, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-240, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-52877, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-4447,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1121985 मृतांची संख्या-971 जिल्ह्यात अकरा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.