खासदार राजीव सातव यांच्या निधनाने मराठवाडा पोरका झाला-शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

हिंगोली ,२१ मे /प्रतिनिधी :-

कॉग्रेसचे नेते, खासदार राजीव सातव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. यानंतरशिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सातव कुटुंबीयांची सांत्वन पर भेट दिली. खासदार राजीव सातव यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने आता मराठवाडा पोरका झाला आहे. अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Displaying IMG-20210521-WA0042.jpg

यावेळी हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर हे उपस्थित होते. चंद्रकांत खैरे यांनी राजीव भाऊ सातव यांच्या आई माजी आरोग्य मंत्री रजनीताई सातव आणि पत्नी प्रज्ञाताई सातव यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.यावेळी त्यांच्यासोबत   उपजिल्हाप्रमुख विनायक (गणू) पांडे, परमेश्वर मांडगे, तालुकाप्रमुख भानुदास जाधव, हिरालाल सोलामपूरे, नगरसेवक रामभाऊ कदम, अतुल बुर्से, राजू संगेकर, संभाजी सोनुने, प. स. सदस्य संतोष गोरे, गुड्डू बांगर, श्याम  कदम, राहुल घुगे, अजिंक्य नागरे, शिवराज पाटील, मयूर शिंदे, अयाझ पठाण, गणेश इंगोले, कांता पाटील, बबलू पंचलिंगे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.