दिलासा :राज्यात दिवसभरात ४७ हजार ३७१ जण कोरोनामुक्त

मुंबई, 20 मे/ प्रतिनिधी :- कोरोना  रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेटही दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याचा रिकव्हरी रेट नव्वदी पार गेला असून आता राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असल्याचं दिसत आहे. आज राज्यात 47,371 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 50,26,308 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रिकव्हरी रेट हा 91.43 टक्क्यांवर पोहोचला आहे.

सक्रिय रुग्णांमध्ये मोठी घसरण

राज्यात 19 मे 2021 रोजी एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ही 4 लाखांहून अधिक होती तर आज सक्रिय रुग्णांची संख्या ही 3,83,253 इतकी झाली आहे. यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घसरण होत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. सातत्याने रुग्णांच्या संख्येत होणारी घट ही राज्यासाठी निश्चितच दिलासादायक बातमी आहे.

आज राज्यात 29,911 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,21,54,275 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,97,448 म्हणजेच 17.09 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 29,35,409 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 21,648 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज कुठल्या विभागात किती रुग्णांचे निदान?

ठाणे – 3767

नाशिक – 4884

पुणे – 7130

कोल्हापूर – 3262

औरंगाबाद – 1640

लातूर – 2245

अकोला – 4364

नागपूर – 2619

एकूण – 29911

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,२१,५४,२७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४,९७,४४८ (१७.०९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २९,३५,४०९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २१,६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,८३,२५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.