लोहा तहसील कार्यालयातील मियावाकी वृक्ष लागवड उन्हाळ्यातही बहरली

लोहा ,१९ मे / प्रतिनिधी :-

लोहा तालुक्यात मागील वर्षी पावसाळ्यात मियावाकी अंतर्गत मोकळ्या शासकीय जागेत विविध वृक्ष लागवड करण्यात आली होती .रखरखत्या उन्हात तहसील कार्यालयातील ही रोपटे बहरली आहेत.स्वतः तहसीलदार परळीकर यांनी या रोपांची पाहणी केली आणि तालुका लागवड अधिकारी श्री सावळे यांच्या कामाची प्रशंसा केली टँकर द्वारे पाण्याची सोय करून ही रोपे स्वतः तहसीलदार यांनी पुढाकार घेऊन जगविली    

सामाजिक वनीकरणच्या वतीने मागील पावसाळ्यात मियावाकी या अंतर्गत शासकीय कार्यालयाच्या मोकळ्या जागेत वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली  तालुका लागवड अधिकारी श्री सावळे यांनी अतिशय प्रभावीपणे या योजनेची अंमलबजावणी केली .त्यांचे सहकारी श्री महाजन , श्री शेख , यांची साथ लाभली , श्री फुसकूलवाड, वाघमारे मामा, आढाव , यांचेही मोठे सहकार्य मिळाले त्यामुळे मियावाकी ही योजना तालुक्यातही यशस्वी झाल्याचे या उन्हाच्या ताडाख्यातही हिरवी झाडे बहरलेली पाहायला मिळते आहे    तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी तहसील कार्यालयातील हिरवेगार रोपे स्वतः पहिली . त्यांच्या सोबत नायब तहसीलदार अशोक मोकले होते लागवड केल्या पैकी सतर टक्के रोपे जगली आहेत .तालुका लागवड अधिकारी प्रकाश  सावळे  यांच्या कामाची तहसीलदार यांनी प्रशंसा केली तसेच यंदाही असेच मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी असा सूचना दिल्या .लोहा तालुका सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी श्री  धुमाळ श्रीं शेख तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बांधावरील वृक्ष लागवड तसेच इतर योजना  सावळे व टीम प्रभावीपणे राबवित आहेत
  टँकर ने पाणी देऊन झाडे जगविली     

अधिकारी कर्तव्यदक्ष आणि  कार्यतत्पर असतील तर काम यशस्वीपणे  होते .सर्वसामान्य माणसांना दिलासा मिळतो .असे लोह्याचे  तहसीलदार परळीकर हे  अधिकारी  आहेत.आलेल्या प्रत्येकाची अडचण सोडविण्याचा प्रयत्न करतात.   तहसील कार्यालयात लागवड केलेल्या जवळपास एक हजार रोपांना  टँकर द्वारे पाणी टाकण्याची व्यवस्था त्यांनी केली आणि एवढ्या उन्हात ती झाड जगली आहेत यासाठी  मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांची त्यांनी मदत घेतली.शिवाय या रोपांचे संगोपन व संवर्धनासाठी नायब तहसीलदार राम बोरगावकर, नायब तहसीलदार अशोक मोकले, कोतवाल संघटनेचे अध्यक्ष माधव काकडे, व कर्मचारी यांनी दक्षता घेतली .