मुरूममधील रूग्णासाठी ऑक्सिजन रूग्णवाहिका

आमदार ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांनी दिलेला शब्द पाळला 

उमरगा ,१७मे /प्रतिनिधी 
तालुक्यातील  मुरूम शहरातील रूग्णासाठी आमदार ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांनी ऑक्सिजन रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली.
युवासेना तालुकाप्रमुख तथा नगरसेवक अजित चौधरी व युवासेना   मुरूम यांनी सातत्याने ऑक्सिजन अँब्यूलन्स  मागणी केली होती. आमदार चौगुले व युवानेते किरण गायकवाड  यांनी शब्द दिला व तात्काळ ऑक्सिजन सेवा  सलेली रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली.


शहरातील ग्रामीण रूग्णालय  येथिल कोविड सेंटरला युवानेते किरण गायकवाड यांनी भेट देऊन रुग्णांची संख्या, सोयी-सुविधा औषधोपचार याची पाहणी केली. तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर, रुग्ण व नातेवाईक यांच्याशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली. 


रुग्णालयात असलेल्या रुग्णांची विचारपूस करत त्यांना धीर दिला. त्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा, औषध उपचार, जेवण, आदी सोयी सुविधा याबाबत विचारपुस केली. आरोग्य यंत्रणा व रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याबाबत सूचना केल्या.
यावेळी युवासेना तालुकाप्रमुख तथा नगरसेवक अजित चौधरी , जगदीश निंबरगे,शहरप्रमुख भगत माळी,शंकर इंगळे ,नाना टेकाळे ,राजेंद्र कारभारी ,पञकार बांधव व  आरोग्य कर्मचारी उपस्थित होते..