मुख्याधिकारी साहेब…:उघडा डोळे-बघा नीट

जुन्या लोह्यात जाणार मुख्य रस्ता अतिक्रमणात..!

लोहा,,१७मे /प्रतिनिधी :-    

वैभवशाली परंपरा  नगर पालिकेच्या  सभागृहाला वैभवशाली परंपरा  आहे  त्याच परंपरेची  दुसरीं- तिसरी पिढी सद्या या सभागृहात आहे पण हे नेतृत्वदुर्लक्ष करताना   दिसते आहे  शिवाय  प्रशासनावर या “खंबीर” नेतृत्वाची वचक राहिला नाही  काय? असा सवाल उपस्थित होतो आहे त्याचे कारण म्हणजे जुन्या शहरात जाणाऱ्या मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे.नव्याने बांधकाम  करणाऱ्यांनी रोडवर बांधकाम केले पण पालिकेने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही.मुख्याधिकारी साहेब  उघडा डोळे..बघा नीट ..आणि मोकळा करा रस्ता अशी जुन्या लोह्यातील जनतेनी मागणी केली आहे.

लोहा नगरपालिकेला वैभवशाली परंपरा आहे पण सध्याचा कारभार  एककल्ली सुरू  आहे .प्रशासनाचे बाहेरच्या लोकांचा आवाजवी हातक्षेप वाढला आहे प्रशासनात नको तेवढा हस्तक्षेप  सुरू आहे. त्यावर कोणाचीही वचक नाही .मुख्याधिकारी यांची  कार्यक्षमतेची  मर्यादा स्पस्ट  झाली आहे.कचरा टेंडर असो की ,न्यायालयीन प्रकारण प्रलंबित, देवस्थानची जमिनीचा वाद पण त्या जागा  पालिकेच्या दप्तरी नोंदविणे नियमात बसते काय? बाजाराचे टेंडर ज्यांना दिले त्यांनी रक्कम भरणा केली काय?  असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात  आहे .

कोरोनाच्या दुसऱ्याची लाठेतही ” काम कमी ..प्रसिद्धी जास्त ..! असा अनुभव शहरवासीयांना आला .तर दुसरीकडे  जुन्या लोह्यात जाणार रस्ता अतिक्रमणा च्या विळख्यात सापडला पण दाद ..फिर्याद..… कोणाकडे ..? असा सवाल  उपस्थिती झाला आहे   जुन्या शहरात जाण्यासाठी शिवकल्याण नगर –  माऊली नगरातून पर्यायी रस्ता तयार झाला पण तो अपवादात्मक स्थितीत …सर्वाधिक वाहतूक , मोठी ,जड चारचाकी वाहने याच रस्त्याने जातात एवढेच नव्हे तर हाच मुख्य जुन्या गावासाठी ( शहर) रस्ता होय . रहदारी  व वाहनांची कोंडी नित्याचीच.. पूर्वी  शहरातील प्रमुख नेते , कार्यकर्ते, नागरिक दुकानदारांना त्यांच्या वस्तू दुकानाच्या  बाहेर ठेवण्यास मज्जाव करीत असत .वाहने रस्त्यात उभी केली तर बाजूला लावा असे आवर्जून सांगत .. नव्याने बांधकाम करणाऱ्यानाही   वचक होती .कोणीतरी विचारणार आहेत अशी भीती होती .पण आता कोणाचाही “धाक” नाही .     नगरपालिका प्रशासन आहेच की नाही अशी सध्या  अवस्था आहे.नको तेथे हस्तक्षेप आणि “कार्यालयीन टिप्पणी , गोपनीय माहितीची खुलेआम चर्चा सुरू आहे.एखाद्याला पत्र देण्या पूर्वीच ते बाहेरच्या व्यक्तीकडे येतेच कसे? मुख्याधिकारी साहेब . उघडा डोळे…आणि पहा..  त्यामुळे सगळीच व्यवस्था कोलमडुन पडली आहे.   

जुन्या लोह्यात जाणाऱ्या रस्त्यावर नव्याने बांधकाम करणाऱ्यानी ……आम्हाला काय कोणाची भीती..”या अविर्भावात नालीच्या पुढे  रोडवर बांधकाम करीत आहेत  त्यामुळे  रस्त्याची कोंडी केली.  ( त्यांनी बांधकाम परवानगी काढली की नाही याची ही शंकाच आहे) त्या बांधकाम करणा ऱ्यांच्या रस्त्यावरच साहित्याचा ढीग टाकला वाहतुकीची कोंडी केली  रस्त्यावर  सताडपणे छताचे पाणी सोडले आहे जे की पावसाळ्यात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर पडते पण वचक कोणाचीच नाही .या सगळ्या नियमबाह्य विषयी पालिका प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टीच दिसते ?   चक्कार शब्दाने दुखावले नाही. हेच बांधकाम पंधरा वीस वर्षा पूर्वी केले असते तर तेव्हा  कै माणिकराव पाटील, कै व्यंकटराव मुकदम, कै विठ्ठलराव पवार,माजी आ.रोहिदासराव चव्हाण, संभाजीराव धुतमल, डॉ ग सो गुंडावार, यशवंतराव चव्हाण ,  लक्ष्मणराव हामदे कल्याणराव सूर्यवंशी, शेषराव चव्हाण किरण वटटमवार ,यासह  प्रमुख नेत्यांनी नेहमीच सार्वजनिक कामांना प्राधान्य दिले गावचे हीत पाहिले .( सद्या स्व हित)  उभे राहून संबंधितांना जाब विचारला असता  . नालीवर, रस्त्यावरचे बांधकाम उभे राहून पडायला लावले असते .पालिका मुख्याधिकारी , कर्मचारी याना खड्डे बोल सुनावले असते ..गावासाठी भांडण अंगावर घेणारे नेते होते म्हणूनच आज या शहराची भरभराट झाली त्यांची गावाप्रति  विकासात्मक भूमिका होती..आजच्या सारखी ही प्रमुख मंडळी असते तर ..शहराचे वाटोळे झाले।असते ?.त्यांच्या विचारांचा वारसा सांगणारी दुसरी तिसरी  पिढी पालिका सभागृहात आहे .त्यांची भूमिका नेहमीच सार्वजनिक व शहराच  शहराच्या हिताची  असते  पण जुन्या  शहरात  जाणार मुख्य व एकमेव रस्ता अतिक्रमणात सापडला आहे .तो  अरुंद झाला आहे. दुकानाच्या समोर वाटेल तशी वाहने उभी करून वाहतूक कोंडी केली जात आहे तरीही अध्याप पालिकेने तोंड उघडले नाही.     

जुन्या लोह्यात येणाऱ्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवावे व वाहतुकीसाठी रस्ता मोकळा रहावा, दुकाना समोरील वाहनांची पार्किग व्यवस्थित करावी मुख्याधिकारी साहेब ..उघडा डोळे ..बघा नीट .! .अन्यथा आंदोलन करू असा इशारा जुन्या लोह्यातील तरुणांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.