आयआयटी मद्रासने एकंदर क्रमवारीत तसेच अभियांत्रिकीमध्ये प्रथम क्रमांक कायम राखला

  • भारतीय विज्ञान संस्था, बंगळूरू विद्यापीठांच्या यादीत अव्वल
  • आयआयएम अहमदाबादने व्यवस्थापन श्रेणीत अव्वल स्थान मिळविले आहे आणि एम्सने सलग तिसऱ्या वर्षी वैद्यकीय श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे
  • मिरांडा महाविद्यालयाने सलग तिसाऱ्या वर्षी महाविद्यालयांमध्ये आपले पहिले स्थान कायम राखल
  • मौलाना आझाद दंत विज्ञान संस्था, दिल्लीने “दंत” प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला, इंडिया रँकिंग 2020 मध्ये प्रथमच दंत संस्थांचा समावेश
Union HRD Minister Virtually Releases “India Rankings 2020” for ...

नवी दिल्ली, 11 जून 2020

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज पाच मापदंडांच्या विस्तृत श्रेणीतील कामगिरीच्या आधारे विविध श्रेणीतील उच्च शिक्षण संस्थाच्या “इंडिया रँकिंग्स 2020” (भारत क्रमवारी 2020) चे प्रकाशन केले. मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थिती मध्ये मंत्र्यांनी आभासी पद्धतीने इंडिया रँकिंग 2020 चे प्रकाशन केले. अतिरिक्त सचिव (उच्च शिक्षण), राकेश रंजन, एमएचआरडी; अध्यक्ष यूजीसी, प्रा. डी. पी. सिंह; अध्यक्ष, एआयसीटीई अनिल सहस्रबुद्धे; अध्यक्ष एनबीए, प्रा. के. के. अग्रवाल; सदस्य सचिव एनबीए, डॉ अनिल कुमार नासा आणि उच्च शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकाशन सोहळ्यात उपस्थिती राहिले. भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या इंडिया रँकिंगची ही सलग पाचवी आवृत्ती आहे. 2020 मध्ये नऊ क्र्मावारींमध्ये पहिल्यांदाच “दंत’ या एका डोमेनचा समावेश करून पहिल्यांदाच एकूण 10 श्रेणी/विषय डोमेन सादर केले आहेत. 

HRD Minister virtually releases India Rankings-2020 for Higher ...

या प्रसंगी मंत्री म्हणाले की, विविध निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांना विद्यापीठाची निवड करण्यामध्ये ही क्रमवारी मार्गदर्शक ठरेल आणि क्रमवारी  विद्यापीठांना विविध क्रमवारी मापदंडांवर त्यांची कार्यक्षमता सुधारण्यास आणि संशोधन आणि सुधारणेच्या क्षेत्रातील उणिवा ओळखण्यात मदत करेल. ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय क्रमवारीमध्ये अधिक चांगले व सुरक्षित स्थान मिळवून देण्यासाठी संस्थांची राष्ट्रीय पातळीवरील क्रमवारीत अजूनही स्पर्धात्मक भावना कायम आहे.

पोखरीयाल म्हणाले की, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय संस्था क्रमवारी आराखडा (एसआयआरएफ) तयार करण्यासाठी हा महत्वाचा पुढाकार घेतला आहे, जो विविध श्रेणी आणि ज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये (डोमेन) उच्च शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीसाठी वापरला जात आहे आणि खरोखरंच आपल्या सर्वांसाठी हे प्रोत्साहनाचे स्रोत आहे. ते म्हणाले की या सरावामुळे संस्थांन डेटा व्यवस्थित एकत्रित करण्याची सवय देखील निर्माण झाली असून या सर्व संस्था बर्‍याच स्पर्धात्मक राहण्याचा  प्रयत्न करतात. एनआयआरएफमध्ये निश्चित केलेल्या मापदंडांच्या विस्तृत श्रेणींनी उच्च शिक्षण संस्थांमध्ये अध्यापन, शिक्षण आणि संसाधने, संशोधन आणि व्यावसायिक सराव, पदवीधर निकाल इत्यादी सर्व महत्वाच्या बाबी यशस्वीरित्या हाताळल्या आहेत हे पाहून मंत्री आनंदित झाले.

प्रादेशिक विविधता, आउटरिच, लिंग समानता आणि समाजातील वंचित घटकांचा समावेश यासारख्या भारतीय परिस्थितीशी संबंधित देश-विशिष्ट मापदंडांचा समावेश रँकिंग कार्यपद्धतीत केला आहे हे जाणून मंत्र्यांना आनंद झाला. सर्व मापदंड आणि उप-मापदंड त्यांना “आकार-स्वतंत्र” आणि “वय-स्वतंत्र” कायम ठेवण्यासाठी योग्यरित्या सामान्य केले जातात जेणेकरून मोठ्या आणि जुन्या संस्थांना त्याचा अनुचित फायदा होणार नाही. श्री पोखरियाल म्हणाले की, महाविद्यालये आणि विद्यापीठांसाठी एकंदरीत रँकिंगशिवाय श्रेणी-विशिष्ट क्रमवारी व अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषध विज्ञान, वास्तुशास्त्र, कायदा व औषध या विषयासाठी विशिष्ट श्रेणीची क्रमवारी करणे खरोखरच उचित आहे. 2020 पासून एक नवीन विषय डोमेन अर्थात “दंत” देखील सादर केला आहे.

निशंक म्हणाले की, कोविड-19 च्या कठीण काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन सराव करण्याची सुविधा मिळावी यासाठी एनटीएने अलीकडेच जेईई आणि नीट (एनईईटी) च्या  विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी अभ्यास अॅप (नॅशनल टेस्ट अभ्यास अॅप) सुरू केले असून सुमारे 65 लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाईन चाचणी सराव करण्यासाठी आधीच हे अॅप डाउनलोड केले आहे.

गेल्या पाच वर्षांपासून अखंडित एनबीए आणि इन्फ्लिबनेट केंद्रामध्ये भारताची क्रमवारी जाहीर केल्याबद्दल मंत्र्यांनी मंत्रालयातील सदस्य, राष्ट्रीय प्रमाणन मंडळाचे सदस्य सचिव आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. तसेच विविध श्रेणी व विषय डोमेनमध्ये पहिले तीन स्थान पटकावलेल्या संस्थांचे त्यांनी अभिनंदन केले.

मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनीही “इंडिया रँकिंग 2020” मध्ये अव्वल स्थान प्राप्त केलेल्या संस्थांचे अभिनंदन केले आणि या वर्षी अव्वल स्थान मिळवू न शकलेल्या इतर सर्व संस्थांना प्रोत्साहन दिले. ते म्हणाले की अशा क्रमवारी आराखड्यामध्ये भाग घेण्यामुळे संस्थेचा आत्मविश्वास दिसून येतो आणि सहभाग घेणे ही यशाची पहिली पायरी आहे, यामुळे संस्थेचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. पारदर्शकता आणि सुदृढ स्पर्धेसाठी क्रमवारी आवश्यक असल्याचे धोत्रे म्हणाले.

क्रमवारी आराखडा मापदंडाच्या 5 विस्तृत सामान्य गटांच्या आधारे संस्थाचे मुल्यांकन करते, ते आहेत अध्यापन, शिक्षण आणि संसाधने (टीएलआर), संशोधन आणि व्यावसायिक सराव (आरपी), पदवीधर परिणाम (जीओ), आउटरिच आणि समावेशन (ओआय) आणि आकलनशक्ती (पीआर). मापदंडांच्या या पाच विस्तृत गटांकरिता नियुक्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे क्रमवारी निश्चित केली जाते.

याशिवाय अर्जदार संस्थांकडून विविध मापादान्दावरील प्राप्त माहिती व्यतिरिक्त जिथे शक्य असेल तिथे तृतीय पक्षाकडून प्राप्त माहितीचा स्त्रोत देखील वापरला आहे. स्कोपस (एल्सेव्हियर सायन्स) आणि वेब ऑफ सायन्स (क्लॅरिव्हेट एनालिटिक्स) प्रकाशने आणि अवतरण डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी वापरले गेले. डेरव्हेंट नाविन्याचा वापर पेटंटवरील डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी केला गेला. या स्त्रोतांकडून प्राप्त डेटा संस्थांना पारदर्शकतेसाठी त्यांच्या अभिप्राय देण्याच्या तरतूदीसह सामायिक केला गेला.

इंडिया  रँकिंग 2020 साठी एकूण 3771 असाधारण संस्थांनी “समग्र” श्रेणीनुसार आणि श्रेणी-विशिष्ट आणि / किंवा डोमेन-विशिष्ट क्रमवारीसाठी अर्ज सादर केले होते. एकूणच, क्रमवारीसाठी 5805 अर्ज या 3771 असाधारण संस्थांनी विविध श्रेणी/डोमेन अंतर्गत केले होते, ज्यामध्ये ज्यामध्ये 294 विद्यापीठे, 1071 अभियांत्रिकी संस्था, 630 व्यवस्थापन संस्था, 334 औषध शास्त्र संस्था, 97 कायदे संस्था, 118 वैद्यकीय संस्था, 48 वास्तुशास्त्र संस्था आणि 1659 सामान्य पदवी महाविद्यालये आहेत. या वर्षी क्रमवारी सरावात संस्थात्मक सहभागामध्ये लक्षणीय वाढ झाली असून हे निष्पक्ष आणि पारदर्शक क्रमवारी सराव म्हणून भारतातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये त्याची ओळख दर्शवते. इंडिया  रँकिंगमध्ये असाधारण अर्जदारांची संख्या 2019 मधील 3127 वरून 2020 मध्ये 3771 पर्यंत वाढली आहे, तर विविध श्रेणीतील क्रमवारीसाठी 2019 मधील 4873  एकूण अर्जांची संख्या वाढून २०२० मध्ये 5805 झाली आहे. म्हणजे एकूण 444 असाधारण संस्था आणि 932 अर्जदारांची वाढ.

सरावाची बाब म्हणून, अभियांत्रिकी शाखेत २०० संस्था, समग्र विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या श्रेणींमध्ये 100 संस्था, व्यवस्थापन आणि औषध शास्त्रामध्ये प्रत्येकी 75, वैद्यकीय क्षेत्रात 40 आणि वास्तुशास्त्र आणि कायदा क्षेत्रामध्ये प्रत्येकी 20  आणि प्रथमच दंत संस्थांमध्ये 30 संस्थाना क्रमवारीत स्थान देण्यात आले आहे.

इंडिया रँकिंग 2020 मध्ये महाराष्ट्राची कामगिरी:

इंडिया रँकिंग 2020 च्या समग्र श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील, भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. विद्यापीठ श्रेणीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी क्रमवारीत 9 वे स्थान पटकावले आहे. अभियांत्रिकी श्रेणीत  भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईने क्रमवारीत तिसरा क्रमांक मिळविला आहे. औषधशास्त्र श्रेणीत रासायनिक तंत्रज्ञान संस्था, मुंबईने क्रमवारीत चौथे स्थान प्राप्त केले आहे. प्रथमच समाविष्ट केलेल्या दंत श्रेणीत डॉ. डी वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांनी क्रमवारीत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

अव्वल 10 इंडिया रँकिंग 2020 ची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *