दुःखद बातमी : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन

पुणे/हिंगोली ,१६ मे /प्रतिनिधी  :  कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे आज सकाळी निधन झाले. ते मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील रहिवासी होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी होते. त्यांना काँग्रेसने गेल्याच वर्षी राज्यसभेचे खासदार केले होते. २०१९ ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढविली नव्हती.२०१४च्या नरेंद्र मोदी यांच्या लाटेत ते हिंगोली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. ते गुजरात राज्याचे काँग्रेसचे प्रभारी होते.मराठवाड्याने  काँग्रेसचा खंदा कार्यकर्ता गमावला आहे. 

 खासदार सातव यांची  प्रकृती काल शनिवारी खालावली होती. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राजीव सातव यांना आता न्युमोनियाची लागण झाली होती . त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती . त्यांच्यावर पुण्यामध्ये जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु होते . 

काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राजीव सातव यांनी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. पण आता त्यांची प्रकृती पुन्हा खालवली असल्याची माहिती काल रात्री  देण्यात आली होती.  सातव यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर पुण्यात जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. प्रकृती खालावल्याने 25 एप्रिल रोजी त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. तर काही दिवस त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवरही ठेवण्यात आले होते. 

दरम्यान, राजीव सातव यांना आता न्युमोनियाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.  कोरोनाची लागण झाल्यामुळे सातव यांना खूप धकवा जाणवत होता. त्यांची प्रकृती बिघडल्याने चिंता व्यक्त केली जात होती. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . 

राजीव सातव यांना 19 एप्रिलपासून थोडे बरे वाटत नव्हते. कोविडची लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्यांनी 21 एप्रिल रोजी कोरोना चाचणी केली. 22 एप्रिल रोजी या रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांनी ट्विट करत संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करुन घ्यावी, असे आवाहन केले होते.