भारतात एकूण 2 कोटीपेक्षा अधिक रुग्ण बरे,राज्यात आज 53 हजार 249 रूग्णांनी कोरोनावर मात

भारतात देण्यात आलेल्या लसीकरण मात्रांची संख्या 18 कोटीच्या जवळ

नवी दिल्‍ली /मुंबई  ,१४ मे /प्रतिनिधी :-

भारतात कोरोना मुक्त झालेल्यांच्या एकूण  संख्येने आज 2 कोटीचा टप्पा (2,00,79,599) पार केला आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 83.50% आहे.गेल्या 24 तासात 3,44,776 रुग्ण बरे झाले. गेल्या चार दिवसात सलग तिसऱ्यांदा, बरे झालेल्यांची संख्या ही कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येपेक्षा जास्त आहे.नुकत्याच बरे झालेल्यांपैकी 71.16% हे  दहा राज्यातले आहेत.

भारतातली उपचाराधीन रुग्ण संख्या आज 37,04,893 पर्यंत घटली आहे. ही संख्या देशाच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णसंख्येच्या 15.41% आहे.गेल्या 24 तासात  उपचाराधीन रुग्ण संख्येत 5,632 ने घट झाली आहे.देशातल्या उपचाराधीन रुग्णांपैकी  79.7%  रुग्ण 12 राज्यात आहेत.

“संपूर्णतः सरकार” दृष्टीकोनाचा अवलंब करत, जागतिक पातळीवरून आलेल्या मदतीचे केंद्र सरकारकडून, राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना अतिशय त्वरेने वितरण जारी आहे.  आतापर्यंत एकूण 9,294 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 11,835 ऑक्सिजन सिलेंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे, 6,439 व्हेंटीलेटर्स/बाय पॅप आणि रेमडेसिवीर औषधाच्या सुमारे 4.22 लाख कुप्या  रस्ते आणि हवाई मार्गाने वितरीत/ पाठवण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर कोविड -19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत देण्यात आलेल्या मात्रा आज 18 कोटीच्या जवळ पोहोचल्या आहेत.आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 26,02,435 सत्रांद्वारे  17,92,98,584 मात्रा देण्यात आल्या  आहेत.यामध्ये 96,18,127 आरोग्य कर्मचारी ( पहिली मात्रा ), 66,04,549 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा ), 1,43,22,390 फ्रंट लाईन कर्मचारी ( पहिली मात्रा ), 81,16,153 फ्रंट लाईन कर्मचारी(दुसरी मात्रा ), 18-45 वयोगटामधले 39,26,334 लाभार्थी ( पहिली मात्रा ) 45 ते 60 वयोगटातल्या 5,66,09,783   ( पहिली मात्रा ), आणि 85,39,763 लाभार्थी (दुसरी मात्रा) 60 वर्षावरील 5,42,42,792 लाभार्थी ( पहिली मात्रा ), 1,73,18,693  (दुसरी मात्रा ), यांचा समावेश आहे.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 66.75% मात्रा दहा राज्यात देण्यात आल्या आहेत.गेल्या 24 तासांत 18-44 वर्षे वयोगटाच्या 4,40,706 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. आणि लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्यामध्ये  32  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये  एकूण 39,26,334 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

गेल्या 24 तासात 20 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या.लसीकरण अभियानाच्या 118 व्या दिवशी (13 मे 2021) ला 20,27,162 लसीकरण मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 18,624 सत्रात 10,34,304 लाभार्थींना पहिली मात्रा  आणि 9,92,858 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा  देण्यात आली.

गेल्या 24 तासात 3,43,144  नव्या रुग्णांची नोंद झाली.नव्या रुग्णांपैकी 72.37% रुग्ण, दहा राज्यांमध्ये आहेत.राष्ट्रीय मृत्यू दर सध्या 1.09%.आहे. गेल्या 24 तासात 4,000 रुग्णांचा मृत्यू झाला.यापैकी 72.70% मृत्यू दहा राज्यात आहे.

राज्यात 39 हजार 923 नव्या रूग्णांची नोंद

मुंबई : राज्यात आता कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 39 हजार 923 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 695 रूग्णांचं निधन झालं आहे. त्याचप्रमाणे 53 हजार 249 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 53 लाख 9 हजार 215 इतकी आहे. तर आतापर्यंत एकुण 79 हजार 552 रूणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

गेल्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सातत्याने वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येसोबतच राज्यात मृतांचा आकडा देखील वाढताच राहिला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात येत असलेल्या आकडेवारीमध्ये काहीसं दिलासादायक चित्र दिसू लागलं आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार राज्यात ४२,५८२ नवे करोनाबाधित तर ५४,५३५ डिस्चार्ज नोंदवण्यात आले होते. शुक्रवारी नव्या करोनाबाधितांच्या संख्येत अजून घट झाल्याचं दिसून आलं. आजच्या आकडेवारीनुसार राज्यात ३९ हजार ९२३ नवे करोनाबाधित आढळले असून ५३ हजार २४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांमध्य हे प्रमाण वाढल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट आता ८८.६८ टक्क्यांवर गेला आहे.

शुक्रवारच्या नव्या आकडेवारीनंतर राज्यात आत्तापर्यंत सापडलेल्या करोनाबाधितांचा आकडा ५३ लाख ९ हजार २१५ इतका झाला आहे, तर त्यातल्या ४७ लाख ७ हजार ९८० रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. यापैकी सध्या राज्यात ५ लाख १९ हजार २५४ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

राज्याचा रिकव्हरी रेट दिलासा देणारा ठरत असला तरी, राज्यात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा मात्र अजूनही खूप मोठा आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यात ६९५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत राज्यात एकूण मृतांचा आकडा ७९ हजार ५५२ इतका झाला आहे. एकूण मृत्यूदर १.५ टक्के इतका जरी नोंदवला गेला असला, तरी एकूण रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत असल्यामुळे हा मृत्यूदर कमी दिसत आहे. प्रत्यक्षात मात्र मृतांचा आकडा जास्तच राहिला असल्याचं गेल्या महिन्याभरातल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.