प्रा.रवींद्र गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त  स्तुत्य उपक्रम : उमरग्यातील सर्व कोविड केअर सेंटरसाठी दिली देणगी 

उमरगा ,१४ मे /प्रतिनिधी :-उस्मानाबादचे शिवसेनेचे माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोना काळात  सामाजिक कार्य करत असलेल्या संघटना व उपक्रमांना सहकार्य म्हणून गायकवाड परिवाराच्या वतीने उमरगा शहरातील सर्व कोविड केंद्रांना अडीच लाख रुपयांची देणगी दिली आहे. 

 ईदगाह कोविड सेंटर, उमरगा, माऊली कोविड सेंटर, उमरगा, बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटर, उमरगा, व श्री.स्वामी समर्थ अन्नसेवा मंडळ, उमरगा या सर्व केंद्रांना प्रत्येकी 61,000 रुपये देणगी अशी एकूण अडीच लाख रुपयांची  देणगी दिली .  या कोविड केंद्रानी स्वबळावर व देणगी स्वरूपात येणाऱ्या मदतीने केंद्रे सुरू केले. येथे कोरोना रुग्णांची उत्तम सोय केली जाते म्हणून  कोविड केंद्राना वाढदिवसाचा खर्च टाळून आर्थिक मद्त देत असल्याचे गायकवाड कुटुंबियांनी यावेळी सांगितले . 
यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड, सौ.उषा (काकू) रविंद्र गायकवाड, बसवराज वरनाळे, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, विलास भगत, अशोक इंगळे, शरद पवार, श्री साठे, अमर स्वामी, काका गायकवाड, डॉ.विष्णू शिंदे, राजू कारभारी, संदीप चौगुले योगेश तापसले आदी उपस्थित होते.