लॉकडाऊनच्या काळात ४७० सायबर गुन्हे दाखल; २५५ जणांना अटक

लॉकडाऊनच्या काळात ४७० सायबर गुन्हे दाखल; २५५ जणांना अटक

मुंबई दि.११- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पावले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४७०  गुन्हे दाखल झाले असून २५५ व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’चे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.

राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४७० गुन्ह्यांची (ज्यापैकी ३१ N.C आहेत) नोंद १० जून २०२० पर्यंत झाली आहे. त्याची प्रामुख्याने जिल्ह्यानुसार आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९४ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट शेअर केल्याप्रकरणी  १९१  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत, इन्स्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब) गैरवापर केल्या प्रकरणी ५० गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २५५ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन (takedown) करण्यात यश आले आहे .

पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील मंचर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे या पोलीस विभागात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ४० वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने परिसरातील एका डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला आहे अशा आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या व्हाट्सअपद्वारे विविध व्हाट्सअप ग्रुपवर शेअर केली होती . त्यामुळे परिसरात अफवा पसरून काही काळ संभ्रम निर्माण झाला होता व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

वेबसाईट सुरक्षिततेची खात्री करा

सध्याच्या काळात, सरकारने ऑनलाईन मद्य खरेदीला व डिलिव्हरीला सशर्त परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, जर तुम्हाला मद्य खरेदी करायचे असल्यास सदर ॲप किंवा वेबसाईट  वापरण्यासाठी सुरक्षित आहे याची  खात्री करा व मगच  वापरा ,तसेच कुठल्याही अॅपवर शक्यतो आपला बँक खात्याचा नंबर ,डेबिट /क्रेडिट कार्ड नंबर व त्यांचे पिन नंबर सेव करू नका. शक्यतो cash on delivery चा पर्याय ऑर्डर बुक करताना निवडा. जर अशा वेबसाईट किंवा अॅपवर तुम्ही फसविले गेले असाल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद करा व www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण  नोंदवा. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *