2 ते 18 वयोगटासाठी कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या/ तिसऱ्या टप्यातील मानवी चाचणीला भारतीय औषध महानियंत्रकांची मान्यता

मेसर्स भारत बायोटेक 525 निरोगी स्वयंसेवकांवर चाचण्या घेणार

Covid 19 vaccine: Centre issues guidelines for vaccination drive | 12 photo  IDs, registration on Co-Win app and more | everything you must know | Zee  Business

नवी दिल्ली,१३ मे /प्रतिनिधी:-

देशाचे राष्ट्रीय नियामक,भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) यांनी  काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर , विषय तज्ञ समिती (एसईसी) ची शिफारस मान्य केली आहे आणि  12.05.2021 रोजी लस उत्पादक भारत बायोटेक लिमिटेडला 2 ते  18 वर्षे वयोगटासाठी कोवॅक्सीन (कोविड प्रतिबंधक लस ) ची  दुसऱ्या/ तिसऱ्या  टप्यातील मानवी  चाचणी घेण्यासाठी  परवानगी दिली.

मेसर्स भारत बायोटेक इंटरनेशनल लिमिटेड, हैदराबाद (बीबीआयएल) ने 2 ते 18 वर्षे वयोगटासाठी कोवॅक्सीन ची  दुसऱ्या/ तिसऱ्या  टप्यातील मानवी  चाचणी घेण्याचा प्रस्ताव दिला होता. 525 निरोगी स्वयंसेवकांवर ही चाचणी घेण्यात येईल.

या चाचणीत ,  0 दिवस  आणि  28 दिवस  दरम्यान अंतस्नायुमधून लसीच्या दोन मात्रा दिल्या जातील.

जलद नियामक प्रतिसाद म्हणून, हा प्रस्ताव विषय तज्ज्ञ समिती (एसईसी) (कोविड -19) कडून  11.05.2021. रोजी विचारात घेण्यात आला. समितीने तपशीलवार विचारविनिमयानंतर प्रस्तावित टप्पा दोन / तीन च्या मानवी चाचणीला सशर्त परवानगी देण्याची शिफारस केली.