परभणी 453 कोरोनाबाधित, 22 जणांचा मृत्यू

परभणी,१२ मे /प्रतिनिधी :-

 जिल्ह्यात गेल्या 24 तासात  453 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, समाधानाची बाब म्हणजे 1 हजार 72 रुग्ण कोरोनामुक्त झाले. विशेष म्हणजे जिल्ह्यात आठवड्याभरापासून नवीन बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.   

परभणी जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचे रुग्ण ज्या प्रमाणात वाढत होते, आता त्याच प्रमाणात मे महिन्यात घटतांना दिसून येत आहेत. आज, बुधवारी 453 नवीन बाधित आढळले तर 1072 कोरोनामुक्त झाले. तसेच गेल्या 24 तासात 22 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालयातील कक्षात 4 हजार 703 बाधित उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत एकूण 1 हजार 75 करोनाबाधितांचा मृत्यू झाला.

तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 44 हजार 416 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 38 हजार 638 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 2 लाख 69 हजार 268 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 2 लाख 24 हजार 733 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, तर 44 हजार 416 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 1070 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले.